शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:29 IST

आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पैसे पक्षाला परत दिलेत असं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

मुंबई - निवडणुकीत १०-१२ कोटी खर्च केले या विधानावरून आमदार प्रकाश सोळंके यांनी घुमजाव केले आहे. मी विनोदाने भाषणात ते बोललो, विरोधकांनी खूप खर्च केला मी कमी केला असं सांगायचे होते, ते आकडे कोटीत नसून लाखात आहेत असं मी लगेच भाषणानंतर स्पष्ट केले असं सांगत आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाकडून प्रत्येक उमेदवाराला ४० लाख रूपये दिल्याचा खुलासा केला आहे.

प्रकाश सोळंके यांचं विधान सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. विधान भवन परिसरात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रकाश सोळंके म्हणाले की, ते वाक्य मी भाषणात बोललो होतो. विनोदातून ते विधान केले. विरोधकांनी खूप खर्च केले मी कमी केला असं सांगितले. मला जी मर्यादा घालून दिली तितकाच खर्च केला. ४० लाख पक्षाने पाठवले, त्यातील २३ लाख खर्च केले उर्वरित पैसे पक्षाला परत पाठवले. पक्षाने प्रत्येक उमेदवाराला ४० लाख दिले. हा व्यवहार चेकने झाला आहे. त्यामुळे रोकड असल्याचं संबंध नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय मी विनोदाने ते बोलत होतो. निवडणुकीतील परिस्थिती लोकांना सांगत होतो. कोटी चुकून बोललो, हे लक्षात आल्यानंतर ती रक्कम लाखात आहे असं मी लगेच सांगितले. संपूर्ण खर्च पक्षाने दिला. आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पैसे पक्षाला परत दिलेत असं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

काय होतं 'ते' विधान?

बीडमधील एका कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके बोलत होते. निवडणूक आली की किती उमेदवार त्यात उभे राहतात त्याला काही मोजमाप नाही. कुणीही येते आणि उभं राहते. कुणीही येते पैशाच्या मस्तीत उभं राहते अशी दुर्दैवाने परिस्थिती झाली आहे. मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने ४५ कोटी खर्च केले असं ऐकिवात आहे. लोक बोलतात ते मी सांगतो, मला माहिती नाही. एकाने ३५ कोटी खर्च केले असं ऐकले, मी १०-१२ कोटीपर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो असं विधान त्यांनी केले, ते विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादीचे २ आमदार आधीच अडचणीत

दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी चर्चेत असलेले धनंजय मुंडे आणि नाशिक येथे फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलेले माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ आमदार आधीच अडचणीत आहेत. संतोष देशमुख प्रकरणात वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला वरिष्ठ कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांच्या मंत्रि‍पदाला कुठलाही धोका नाही. त्यातच प्रकाश सोळंके यांच्या विधानामुळे तेदेखील चांगलेच गोत्यात आले. 

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2024