शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींबाबात माझी काहीही तक्रार नाही

By admin | Updated: January 8, 2017 00:47 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर काही शिवसैनिकांनी केलेल्या

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर काही शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत शनिवारी महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष नोंदवली. या साक्षीत भुजबळांनी आरोपींना माफ करा. मला हे प्रकरण पुढे न्यायाचे नाही, असे दंडाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र त्यांच्या या साक्षीमुळे खटल्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.भुजबळांनी साक्षीत ही घटना घडल्याचे मान्य केले. मात्र आरोपींना माफ करा, असेही भुजबळांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. ‘बाळासाहेबांची प्रकृती खराब झाल्यानंतर मी त्यांच्याविरुद्ध आणि ‘सामना’ विरुद्ध केलेला बदनामीचा दावा मागे घेतला,’ अशी माहिती भुजबळ यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली.आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या आरोपींनी भुजबळ यांनी ओळखले नाही. परंतु, गेले २० वर्षे हे आरोपी कोर्टाच्या चकरा मारत असल्याने त्यांना माफ करावे, असे भुजबळ यांनी म्हटले.‘हल्ला झाला तेव्हा भुजबळ अन्य रुममध्ये होते. त्यामुळे त्यांनी आरोपीला ओळखणे शक्य नाही. भुजबळांनी त्यांच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची घटना दंडाधिकाऱ्यांना सांगितली. तो बंगला त्यांचा असल्याने त्यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले. या खटल्यामध्ये आणखी एक साक्षीदार आहे. त्याने या आरोपींना पाहिले आहे. त्यामुळे भुजबळांनी जरी आरोपींना माफ करा म्हटले असले तरी त्याचा या खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण ही केस सरकार चालवत आहे,’ असे सरकारी वकील राजेंद्र सुर्यवंशूी यांनी सांगितले.१९९६-९७ रमाबाई आंबडेकर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर मोठा सामाजिक तणाव निर्माण झाला होता. दंगल झाली होती. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. (प्रतिनिधी)युती आघाडीने केले होते आरोप-प्रत्यारोपआंबेडकर कॉलनीत झालेल्या गोळीबारात १० जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेवरून सत्ताधारी युती आणि आघाडीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावेळी छगन भुजबळ विरोधी पक्षनेते होते. भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच पुतळ्याची विटंबना करण्यात आली, असा आरोप केला गेला. सेनेच्या मुखपत्रातही हे वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्याचवेळी भुजबळांच्या बंगल्यावरही हल्ला करण्यात आला.