शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उपाशी जनावरे सोडली उभ्या पिकांत!

By admin | Updated: August 19, 2014 01:54 IST

ऑगस्टचा अर्धा महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. माणूस कर्ज काढून, भीक मागून पोट भरेल, पण दावणीला बांधलेल्या जनावरांचे काय?

रवींद्र भताने ल्ल चापोली (जि. लातूर)
ऑगस्टचा अर्धा महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. माणूस कर्ज काढून, भीक मागून पोट भरेल, पण दावणीला बांधलेल्या जनावरांचे काय? उपोशीपोटी जीव गेल्यापेक्षा उरलेसुरले पीक खाऊ घालून जगविले जात आहे. लातूर जिल्ह्यातील चापोली गावातील शेतक:यांची ही व्यथा. मराठवाडय़ात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र अशीच स्थिती आहे. 
शांतप्पा रामलिंग गादगे यांच्याकडे 25 एकर कोरडवाहू शेती असून, तीन लाखांचे कर्ज आहे. माणसांचे काय, आणखी कर्ज काढून पोट भरू. पण जनावरांचे काय, असा सवाल करून ते म्हणाले, गेल्यावर्षीचा थोडाफार चारा होता. गारपिटीत तोही साफ झाला. आता वीतभर आलेल्या पिकांवर जनावरांना जगवावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 
गंगाधर बावचे 24 एकरचे धनी. त्यांनी 16 एकरांत ऊस घेतला असून, उर्वरित आठ एकरांत सोयाबीन पेरले आहे. बँकेचे अडीच लाख आणि खाजगी दोन लाख असे साडेचार लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. थोडेफार आलेले सोयाबीन हरणांनी फस्त केले. 11 जनावरांनी काय खायचे? थोडेथोडे करून त्यांना उभा ऊस खाऊ घालत असल्याचे बावचे म्हणाले. नागनाथ आबंदे 14 एकरांचे मालक. त्यांनी ऊस, टोमॅटो आणि कोबीचे पीक घेतले आहे. आधी विहीर आणि बोअरला पाणी होते. आता दोन्हीकडे खरडण लागली आहे. त्यामुळे 25 जनावरांच्या चा:याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आता ऊस तोडून त्यांना जगवत असल्याचे आबंदे म्हणाल़े शिवानंद गोरप्पा होनराव यांचीही हीच व्यथा. त्यांच्याकडे सात एकर शेती आणि चार म्हशी आहेत. त्यातली एक अलीकडेच व्याली आहे. चाराच नसल्याने ती दूधही देत नाही. पिकावर गाईचे वासरू सोडले. कोवळे पीक खाल्ल्याने ते मेले. आता या जनावरांना काय खाऊ घालायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
श्रीरामचंद्र होनराव यांच्याकडे 1क् एकर शेती असून, सात जनावरे आहेत. त्यांच्यावर जवळपास अडीच लाखांचे कर्ज आहे. पाच एकरांवरील ऊस वाळत आहे. चाराच नसल्याने जनावरांना तो खाऊ घालत असल्याचे होनराव म्हणाले.  
17 एकर शेती असलेले संभाजी जगदाळे शेतात आलेले थोडेफार पीक घालून सहा जनावरांना जगवत आहेत. तर दावणीच्या जनावरांना उपाशी कशासाठी मारायचे, म्हणून सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडत असल्याचे परमेश्वर मुर्गे यांनी सांगितले. 
 
च्पाऊस नसल्याने चा:याचा प्रश्न गंभीर बनला आह़े खरिपातील पिके वाळत आहेत़ चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही़, असे तालुका कृषी अधिकारी तुकाराम कासले यांनी सांगितले.
 
च्ऑगस्टचा अर्धा महिना संपला तरी मराठवाडय़ात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर मोठय़ा प्रमाणात संकट ओढवले असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाढ पाहात आहे.
 
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके माना टाकत आहेत़ जनावरांच्या चा:याचाही प्रश्न गंभीर बनला आह़े परमेश्वर मुर्गे यांनी शेतातील सोयाबीनमध्ये जनावरे सोडून पशुधन जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े