"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:59 IST2025-10-03T11:58:46+5:302025-10-03T11:59:36+5:30
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh's Murder: हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आता, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला...

"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh: संतोष देशमुख यांच्या खुनाचा बदला होणार. राहिलेल्यांनाही अटक करायची आहे. ती लढाईपण आता सुरू होणार आहे. महादेव मुंडे खुनाचे काय झाले? गिते नावाचे आहेत, त्यांच्यासंदर्भात काय झाले? असे सवाल करत, पुढे बघा आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे आता यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत, असा थेट इशाराही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते एका खासगी रुग्णालयातून पत्रकारांसी बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणतात, मला काही लोकांनी अडचणीत आणलं. पण बहिणीने सावरलं, तासंतास सोबत बसून आधार दिला..., असे विचारले असता जरांगे म्हणाले, "तो त्यांचा घरगुती प्रश्न आहे. त्याच्याशी आपल्याला काय करायचे. साथ द्या नका देऊ. पण खुनाचा बदला होणार. संतोष देशमुखांचा जो खून केला, त्याला फाशी होणार. राहिलेल्यांनाही अटक करायची आहे. ती लढाईपण आता सुरू होणार आहे. महादेव मुंडे यांच्या प्रकरणाची लढाईही पुन्हा नव्याने सुरू होणार."
...आता त्यासंदर्भातही मोठे आंदोलन नव्याने सुरू होणार -
जरांगे म्हणाले, "मी सरकारला गेल्या पाच-सात दिवसांत यासंदर्भात बोललो आहे की, महादेव मुंडे खुनाचे काय झाले? गिते नावाचे आहेत, त्यांच्यासंदर्भात काय झाले? आज मी माध्यमांना सांगत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणातील जे फरार आरोपी आहेत, त्यांच्या अटकेचे काय झाले? त्यांच्यावरील मोकोका कशामुळे उठवला? यासंदर्भातही आपण सरकारसोबत बोललो आहोत. कारण त्यासंदर्भातही खूप मोठे आंदोलन आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. असेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.