शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ‘वॉच’ ठेवणार कसा?

By admin | Updated: June 19, 2014 01:05 IST

औरंगाबाद येथील एका ‘ग्रुप’वर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे टाकणाऱ्या ‘अ‍ॅडमिन’ला अटक झाल्यानंतर यावरील नियंत्रणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘३-जी’ युगात ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हा बहुतांश ‘स्मार्टफोन

पोलिसांकडे तांत्रिक प्रणालीच नाही : आक्षेपार्ह ‘मॅसेज’चे प्रमाण वाढीस योगेश पांडे - नागपूरऔरंगाबाद येथील एका ‘ग्रुप’वर आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे टाकणाऱ्या ‘अ‍ॅडमिन’ला अटक झाल्यानंतर यावरील नियंत्रणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘३-जी’ युगात ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हा बहुतांश ‘स्मार्टफोन युजर्स’च्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. याचा वापर ज्याप्रकारे वाढीस लागला आहे त्याप्रमाणे या माध्यमाचा दुरुपयोग होऊ लागला आहे. आक्षेपार्ह ‘मॅसेजेस’वर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी नागपूर पोलिसांवर आहे. परंतु यावर नियंत्रण किंवा ‘वॉच’ ठेवणारी तांत्रिक प्रणालीच उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील ‘ग्रुप्स’च्या ‘अ‍ॅडमिन’ची जबाबदारी ठरविण्याची गरज आहे. उपराजधानीत ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे असंख्य ‘ग्रुप्स’ आजच्या घडीला अस्तित्वात आहेत. यातील काही ‘ग्रुप्स’ वरुन आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओ टाकण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यातून जातीय दंगली, सामाजिक तेढ वाढणे असे प्रकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपूर पोलिसांनी यासंदर्भात जनजागृतीचे प्रयत्न चालविले आहेत. परंतु दुर्दैवाने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील मजकुरावर नियंत्रण आणणारी किंवा ‘वॉच’ ठेवणारी तांत्रिक प्रणालीच उपलब्ध नाही. केवळ तक्रारींच्या आधारे पुढील कारवाई करणे इतकेच हाती असल्याने पोलिसांसमोरील प्रश्न वाढले आहे. आक्षेपार्ह छायाचित्रांची पोलिसात तक्रार करा! ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून आक्षेपार्ह गोष्टींचा प्रसार करणाऱ्यांवर वचक रहावा यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. कोणी विकृत छायाचित्रे प्रसिद्ध करीत असेल तर ग्रामीण पोलिसांचा हेल्पलाईन क्रमांक ८८८८१७४१०० यावर संपर्क साधावा. तक्रारकर्त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी सांगितले.‘व्हॉट्सअ‍ॅप’चा दुरुपयोग करून सामाजिक एकतेला धक्का पोहोचविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. परंतु ‘व्हॉट्सअ‍ॅप’हे ‘मोबाईल टू मोबाईल’ चालते. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवणे कठीण आहे. विभागाकडेदेखील यावर लक्ष ठेवणारी प्रणाली नाही. परंतु जर कोणी तक्रार केली तर त्या आधारावर संबंधित ‘अ‍ॅडमिन’ किंवा ‘मॅसेज’ टाकणाऱ्या व्यक्तीवर निश्चितच कारवाई होऊ शकते. याकरिता ‘व्हॉट्सअ‍ॅप युजर्स’नेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. जर कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह ‘मॅसेज’ दिसला तर सायबर सेलकडे तक्रार केली पाहिजे असे आवाहन पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे यांनी केले. ‘अ‍ॅडमिन’ आहात, ‘बी अलर्ट’‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ‘ग्रुप’ तयार करणाऱ्या एका ‘अ‍ॅडमिन’ला आक्षेपार्ह ‘मॅसेज’ टाकल्यामुळे पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. शेख कलीम नावाच्या एका विद्यार्थ्याने ‘ग्रुप’ तयार केला व त्यावरून धार्मिक भावना भडकाविणारी छायाचित्रे सर्वांना पाठविली. पोलिसांना यासंदर्भात काहीच माहिती नव्हती. यासंदर्भात एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर मात्र लागलीच कारवाई करीत ‘अ‍ॅडमिन’ला अटक केली. या घटनेनंतर अनेक ‘अ‍ॅडमिन’चे धाबे दणाणले आहेत. उपराजधानीत अनेक ‘ग्रुप्स’वर सातत्याने अश्लील तसेच आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. मागील आठवड्यातच बुटीबोरी येथे मोठा अपघात झाल्याची अफवा या माध्यमातून पसरविण्यात आली होती. त्यामुळे ‘ग्रुप’मधील सदस्य नेमका काय मजकूर टाकतात यावर लक्ष ठेवण्याची ‘अ‍ॅडमिन’ची जबाबदारी आहेच. जर कुणी सदस्य असे प्रकार करत असेल तर त्याला कायद्याचा धाक दाखविणे आवश्यक झाले आहे.