शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:06 IST

Holiday Municipal Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यात एकाचवेळी २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील महापालिकांचा समावेश असून, १५ जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने २९ शहरांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

सामान्य प्रशासन विभागाने ६ जानेवारी २०२६ रोजी याबद्दलचे आदेश काढले आहेत. केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुटी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहणार असल्‍याचे सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या अध्‍यादेशात नमूद आहे.

उद्योग आणि कामगार विभागानेदेखील सार्वजनिक सुटीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुटी लागू असणार आहे.

सुट्टी देणे शक्य नसेल, तर कार्यालयांना काय आदेश?

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असे अध्यादेशात नमूद आहे.

२९ महापालिकांची यादी 

१) बृहन्मुंबई महापालिका

२) ठाणे महापालिका

३) नवी मुंबई महापालिका

४) उल्हासनगर महापालिका

५) कल्याण-डोंबिवली महापालिका

६) भिवंडी-निजामपूर महापालिका

७) मिरा-भाईंदर महापालिका

८) वसई-विरार महापालिका

९) पनवेल महापालिका

१०) नाशिक महापालिका 

११) मालेगाव महापालिका

१२) अहिल्यानगर महापालिका

१३) जळगाव महापालिका

१४) धुळे महापालिका

१५) पुणे महापालिका 

१६) पिंपरी-चिंचवड महापालिका

१७) सोलापूर महापालिका

१८) कोल्हापूर महापालिका

१९) इचरलकरंजी महापालिका

२०) सांगली मिरज कुपवाड महापालिका

२१) छत्रपती संभाजीनगर महापालिका

२२) नांदेड-वाघाळा महापालिका

२३) परभणी महापालिका

२४) जालना महापालिका

२५) लातूर महापालिका

२६) अमरावती महापालिका

२७) अकोला महापालिका

२८) नागपूर महापालिका

२९) चंद्रपूर महापालिका

 

English
हिंदी सारांश
Web Title : Holiday declared in 29 cities for municipal elections on January 15

Web Summary : Maharashtra declares January 15th a public holiday in 29 cities for municipal elections. This allows voters, including those working outside their city, to cast their ballots. Essential services unable to grant a full day off must provide a 2-3 hour voting break.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६VotingमतदानHolidayसुट्टीBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६