शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर बंद पडल्याने द्रुतगती महामार्ग ठप्प

By admin | Updated: September 6, 2016 03:50 IST

अवजड सामान वाहून नेणारा ट्रेलर बंद पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक आठ तास ठप्प झाली.

लोणावळा (पुणे) : अवजड सामान वाहून नेणारा ट्रेलर बंद पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक आठ तास ठप्प झाली. अमृतांजन पुलाजवळील उतारावर हा ट्रेलर बंद पडल्याने सकाळी ६.१५ पासून वाहतूक ठप्प झाली. ट्रेलर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे निकराचे प्रयत्न पोलिसांनी केले, परंतु ट्रेलर अवजड असल्याने तेही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खंडाळा व बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूलदरम्यान उतारावर पहाटे हा ट्रेलर बंद पडला. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन मार्गिका प्रथम बंद झाल्या.(प्रतिनिधी)त्यानंतर वाहतूक वाढल्याने काही वेळातच तिसऱ्या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी होऊन संपूर्ण महामार्ग ठप्प झाला. गणेशोत्सवानिमित्त गावांकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना या वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. ट्रेलर बाजूला करण्यासाठी पोलिसांंनी निकराचे प्रयत्न केले. मात्र, ट्रेलरमधील सामान अत्यंत अवजड असल्याने त्यांना यश आले नाही. मोठी क्रेन लावूनही ट्रेलर जागचा हालत नव्हता. दुपारी दोनपर्यंत मोठ्या क्रेनने ट्रेलर बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू झाली. त्यानंतरही सुमारे दोन-तीन तास वाहतूक सुरळीत झाली नव्हती. लोणावळ््यातही वाहतूककोंडी द्रुतगती महामार्ग ठप्प झाल्यानंतर पोलिसांनी मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक वलवण गावाजवळून लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर वळवली. यामुळे लोणावळ्यातही काही वेळ मोठी वाहतूककोंडी झाली होती. (प्रतिनिधी)