शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर हायस्पीड !

By admin | Updated: May 27, 2014 01:40 IST

महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या कार्याला गती देण्यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) हिरवी झेंडी दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या सीमेमधील महामार्गावर वाहनांना ८०

 राष्टÑीय महामार्ग प्रशासनाची हिरवी झेंडी: १०० कि.मी. प्रतितास वेगाची परवानगी !

 

 वसीम कुरैशी - नागपूर

महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या कार्याला गती देण्यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) हिरवी झेंडी दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या सीमेमधील महामार्गावर वाहनांना ८० कि.मी. प्रतितासाची अट आहे, विकास कार्य पूर्ण झाल्यानंतर एनएचएआय यात बदल करून १०० कि.मी. प्रतितास करणार आहे. यामुळे महामार्गावर आता पूर्वीपेक्षा अधिक गतीने वाहने धावताना दिसून येतील. प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनुसार नवीन निर्देश आल्यास नागपूर ते हैदराबाद ६ तास, नागपूर ते रायपूर ४ तास तर नागपूर ते अमरावती सुमारे २.३० तासाचा वेळ लागेल. वेग वाढल्याने मालवाहतुकीला व प्रवासी परिवहनमध्येही गती येईल. नागपूर-भंडारा मार्गावरील चौपदरी रस्त्याचे कार्य नुकतेच पूर्ण झाले. नागपूर-ओबेदुल्लागंज एनएच ६९चे कार्य अद्यापही सुरू आहे. याला पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. एनएचएआयचे अधिकारी वेगाला घेऊन मोठमोठे दावे करीत असले तरी अनेक रस्त्याच्या दुर्दशेला घेऊन काही बोलण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे नागपूर-हैदराबाद मार्गावर सुमारे ४६ कि.मी.पर्यंतचा रस्ता खराब आहे. नागपूर-उमरेड रस्त्याचीही हालत खस्ता आहे. शहरातील महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी एनएचएआयकडून मनपाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. याला घेऊन मनपा आयुक्तांनी एनएचएआय अधिकार्‍यांशी रविवारी बैठक घेतली.