शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित दाम्पत्याने मुलीस डांबून केला छळ

By admin | Updated: August 24, 2014 00:50 IST

ऑल वूमन मोबाईल पेट्रोलिंग पथकाने केली सुटका

अकोला : उच्चशिक्षित दाम्पत्याच्या छळाला कंटाळलेल्या एका १३ वर्षीय मुलीची ह्यऑल वुमन मोबाईल पेट्रोलिंगह्ण पथकाने सुटका केली. ह्यऑल वुमन मोबाईल पेट्रोलिंगह्ण पथकाच्या प्रमुख एपीआय ज्योती विल्हेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील कीर्ती नगरातील प्रा. आभा सुनीत खेडेकर (४५) व त्यांचे पती सुनीत खेडेकर यांनी दीड महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्हय़ातील भुतनी गावामधील एका १३ वर्षीय मुलीला घरकामासाठी अकोल्यात आणले. त्यासाठी तिच्या आईला काही पैसेही दिले. ही मुलगी खेडकर यांच्या घरामध्ये धुणी-भांडी व घरकाम करीत असे. दरम्यान, तिच्याकडून कामामध्ये दिरंगाई झाल्यास खेडेकर दाम्पत्य तिला अमानुष मारहाण करीत होते. तिला घरातील व्हरांड्यामध्ये झोपवित होते. खेडकर दाम्पत्याच्या सततच्या छळाला कंटाळून या मुलीने शनिवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे बघून पळ काढला. तिने कसेबसे बस स्थानक गाठले. बस स्थानकावर ती गोंधळलेल्या मनस्थितीत फिरत असताना, एका सुज्ञ नागरिकाचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याने तिची चौकशी केली. त्यानेच विल्हेकर व त्यांच्या पथकाला माहिती दिली. पथकातील पोकॉ भारती बोरकर, पोकॉ खुदेजा, शिल्पा वानखडे, सुमन पळसकर यांनी मुलीला ताब्यात घेतले. त्यावेळी ही मुलगी भेदरलेली होती. पथकातील महिला कर्मचार्‍यांनी मुलीची चौकशी करून तिला विश्‍वासात घेतले. त्यानंतर या मुलीने खेडेकर दाम्पत्याने तिच्यावर केलेल्या अत्याचाराचा पाढाच पथकासमोर वाचला. मुलीच्या हातावर काही जखमाही दिसून आल्या. विल्हेकर यांनी ही माहिती बालकल्याण समितीचे संजय सेंगर, चाईल्ड लाईनचे प्रशांत बांबटकर यांना दिली. त्यांनी मुलीची चौकशी केली. यावेळी पोलिसांनी खेडेकर दाम्पत्यालाही महिला तक्रार निवारण कक्षामध्ये चौकशीसाठी बोलाविले होते.

** दीड महिन्यांपासून सुरू होता छळ

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार खेडेकर दाम्पत्याने तिच्या आईला १0 ते १५ हजार रुपये देऊन तिला अकोल्यात आणले. यापूर्वी ऊर्मिलाची मोठी बहीणसुद्धा या दाम्पत्याकडे कामाला होती. घरातील धुणी-भांडी, फरशी यासोबतच घरातील अन्य कामेही हे दाम्पत्य तिच्याकडून करून घेत होते. कामामध्ये थोडीही चूक झाली तर दाम्पत्याकडून तिला मारहाण करण्यात असे. हा प्रकार गत दीड महिन्यांपासून सुरू होता.