शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्या तपासावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

By admin | Updated: September 3, 2015 01:56 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यात अपयशी ठरलेल्या सीबीआयला

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यात अपयशी ठरलेल्या सीबीआयला व राज्य शासनाला बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले़ या तपासावर न्यायालयाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करीत न्यायालयाने तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही सीबीआयला दिले़डॉ़ दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नसल्याने त्यांची मुलगी मुक्ता व मुलगा हमीद यांनी याचिका दाखल केली आहे़ तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी करणारी याचिका पानसरे यांची मुलगी स्मिता व सून मेघा यांनी केली आहे़ न्या़ रणजित मोरे व न्या़ राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली़ डॉ़ दाभोलकर यांची हत्या आॅगस्ट २०१३ मध्ये झाली़ २०१४ मध्ये याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़ डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली तरी तपास यंत्रणेच्या हाती मारेकरी लागलेले नाहीत़ राज्य शासनानेही सीबीआयच्या मदतीसाठी राज्य पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ यात साहाय्यक पोलीस आयुक्त, चार पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उप निरीक्षक आहेत़ हे अधिकारी नागपूर व यवतमाळ येथील आहेत़ सीबीआय व या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दोभोलकर भावंडांचे वकील अ‍ॅड़ अभय नेवगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त होऊन न्यायालय म्हणाले, दाभोलकर यांची हत्या दोन वर्षांपूर्वी झाली़ अद्याप त्यांचे मारेकरी सापडले नाहीत़ शिवाय राज्य शासनाने सीबीआयच्या मदतीसाठी दिलेले अधिकारी नागपूर व यवतमाळ येथील आहेत, ही बाब दुर्देवी आहे़ हे पोलीस अधिकार पुणे येथीलच असायला हवे होते़ पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती का केली नाही? याचे प्रत्युत्तर शासनाने सादर करावे़ तसेच या तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल सीबीआयने सादर करावा, असे आदेश खंडपीठाने दिले़ (प्रतिनिधी)‘अघोरी’ दावा करणाऱ्यासाध्वीला हल्ल्याची भीतीनाशिक: अघोरी विद्येच्या आधारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लावण्याचा दावा करणाऱ्या साध्वी शिवानी दुर्गा यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. समितीचे कार्यकर्ते माझ्यावर संतापले असून ते कधीही माझ्यावर हल्ला करतील, अशी भीती साध्वींनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. साध्वींच्या दाव्याला खोटे ठरवित नाशिकच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हान दिले आहे.