शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 08:22 IST

झाडे उन्मळून पडली; फळबागांना फटका, पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यात मंगळवारी वादळी पावसाने दाणादाण उडविली.  वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पशुधन दगावले. छतांवरील पत्रे, झाडे उन्मळून पडली. फळबागांचेही नुकसान झाले.

वीज पडून विटा बु. (ता. पाथरी, जि. परभणी) येथे धोंडीराम बापूराव हलबुरगे (४२) यांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात रामपूर (ता. राहुरी) येथे राहुल  पठारे (३७), वर्धा जिल्ह्यातील तळोदी शिवारात बळीराम परचाके (६२), नाशिक जिल्ह्यात सोनगिरी (ता. सिन्नर) येथे रवींद्र प्रभाकर बोडके (३४) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

कोकण, प. महाराष्ट्राला तडाखासिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यात अर्धा तास ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ३५ हून अधिक झाडांसह जाहिरातींचे फलक कोसळले. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे नुकसान झाले. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. 

गारपीट, मुसळधार  अहिल्यानगरच्या जामखेड  तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस व वादळामुळे नुकसान झाले.

मराठवाड्यात तडाखापरभणीतील जिंतूरमध्ये पत्रे उडून दगडांचा मार बसल्याने दहा जण जखमी झाले. लातूरमध्येही वादळी पाऊस झाला. मराठवाड्यात १७ दिवसांत अवकाळी पावसामुळे २७ नागरिकांचा मृत्यू झाला, २१ जण जखमी झाले. 

मान्सूनची आगेकूच; सहा दिवस आधीच धडकणारनवी दिल्ली : केरळमध्ये साधारणत: १ जूनला पोहोचणारा नैऋत्य मान्सून पुढील चार ते पाच दिवसांतच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी ही माहिती दिली.

बंगळुरूमध्ये तुफान पाऊस, ५ जणांचा मृत्यूबंगळुरूमध्ये मागील ३६ तासांपासून होत असलेल्या तुफान पावसामुळे मंगळवारीही जनजीवन प्रभावित झाले व अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पावसाशी संबंधित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. 

जोरदार पावसामुळे शहराच्या साई लेआऊटमध्ये एखाद्या द्वीपसारखी स्थिती झाली. येथील घरांचे जमिनीवरचे मजले अर्धेअधिक पाण्यात बुडाले आहेत. सोमवारी सुमारे १५० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. आसामची राजधानी गुवाहाटीत सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला व अनेक रस्ते, भाग जलमय झाले. 

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यूFarmerशेतकरी