शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 9:31 PM

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक  जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक  जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.  ७ व ८ ऑगस्टला कोल्हापूर, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.      कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असून मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे़. विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला आहे़. दक्षिण गुजरात किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस होत आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे़. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. मराठवाड्यात उमरगा ६०, निलंगा ३०, फुलंब्री, वैजापूर २०, औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, लोहारा, तुळजापूर, उदगीर १० मिमी पाऊस झाला़. विदर्भात अकोट, चिखलदरा, वर्धा २० मिमी पाऊस झाला असून काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाला़.

इशारा : ६ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़.

 

  •  सातारा, कोल्हापूर, नाशिक येथे ६ ऑगस्टला काही ठिकाणी जोरदार तर ७ व ८ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़.

 

  •  रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता.

 

  •  रायगड व ठाणे जिल्ह्यात  ६ व ७ ऑगस्टला तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता.

 

  • पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस.

 

  • पुणे जिल्ह्यात घाट परिसरात पुढील चार दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता.

 

  • अन्य जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता़ .
टॅग्स :RainपाऊसfloodपूरNashikनाशिकkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरkonkanकोकण