शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 6:42 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे.

Haryana BJP News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. हरियाणातील भाजप सरकारवर मोठे संकट कोसळले आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. हे तिन्ही आमदार आता काँग्रेसच्या बाजूने गेले आहेत. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत पुंद्री येथील अपक्ष आमदार रणधीर गोलन, निलोखेरीतील धरमपाल गोंदर आणि चरखी दादरी येथील सोमवीर संगवान यांनी पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. 

सरकारच्या धोरणांवर आपण खूश नसल्यामुळे भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे या तिन्ही अपक्ष आमदारांनी सांगितले. दरम्यान, अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणातील बहुमताचे गणित बिघडले आहे. 90 जागांच्या हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे. भाजपकडे 41 आमदार असून त्यांना 6 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता. यापैकी तिघांनी आता पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आता हरियाणातील सैनी सरकारकडे फक्त 44 आमदार शिल्लक आहेत.

आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना म्हणतात की, "मला आताच ही माहिती मिळाली आहे. कदाचित काँग्रेस आता काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात गुंतली आहे. काँग्रेसला जनतेच्या इच्छेशी काहीही देणेघेणे नाही." तर, दुसकडे काँग्रेस खासदार दीपेंद्रसिंग हुडा म्हणाले, "राज्यातील (हरियाणा) परिस्थिती भाजपच्या विरोधात आहे, त्यामुळे बदल होणे निश्चित आहे. भाजप सरकारने बहुमत गमावले आहे." 

जेजेपी आमदार किंग मेकर ठरणार?हरियाणातील या राजकीय गोंधळादरम्यान एकेकाळी भाजप सरकारचा मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार किंग मेकर ठरू शकतात. कारण, जेजेपीचे 10 पैकी 7 आमदार सध्या त्यांच्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजप या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. विधानसभेत बहुमत चाचणी झाल्यास, हे 7 आमदार क्रॉस व्होटिंगद्वारे भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा मतदानापासून दूर राहून भाजपला विश्वासदर्शक ठराव मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांची संख्या कमी करण्यास मदत करू शकतात.

भाजप-जेजेपीमध्ये वादहरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजप आणि जेजेपीने युती करुन निवडणूक लढवली होती. निवडणुकीत भाजपला 41 तर जेजेजीला 10 जागा मिळाल्या. या दोघांनी चार वर्षांहून अधिक काळ एकत्र सरकार चालवले. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जेजेजीला बाजुला केले. तसेच, मनोहर लाल खट्टर यांना हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवून नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले. सैनी यांनीही 6 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता सरकार संकटात आले आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस