तापलेल्या विदर्भाला आता ‘अवकाळी’चा इशारा; अमरावतीचा पारा ४६.६ वर, १९ शहरेही ४० अंशाच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:49 IST2026-04-28T10:48:33+5:302026-04-28T10:49:29+5:30
मुंबईचे तापमान सध्या स्थिर असले तरी हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाने निथळत आहेत.

तापलेल्या विदर्भाला आता ‘अवकाळी’चा इशारा; अमरावतीचा पारा ४६.६ वर, १९ शहरेही ४० अंशाच्या पार
मुंबई - विदर्भात मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी कोसळेल, तर उर्वरित राज्यातील कमाल तापमान किंचित घटेल किंवा ते ‘जैसे थे’च राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला. राज्यात सर्वाधिक कमाल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती आणि अकोला येथे झाली, तर मुंबईत ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात १ मेूपर्वी पुन्हा पश्चिमेकडील वारे सक्रिय होत आहेत. त्यामुळे तापमानात घट होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.
मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ पर्यंत घटेल. मराठवाड्यात तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहील. खान्देश आणि विदर्भात तापमान ४० पर्यंत घसरण्याची शक्यता.
मुंबईकर ओलेचिंब : मुंबईचे तापमान सध्या स्थिर असले तरी हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाने निथळत आहेत. रणरणते ऊन आणि घामाच्या धारांनी चाकरमान्यांना बेजार केले आहे.