आरोपींच्या फाशीवर १८ जुलैपासून सुनावणी

By Admin | Updated: June 17, 2014 03:36 IST2014-06-17T03:36:30+5:302014-06-17T03:36:30+5:30

न्या़ विजया कापसे-ताहिलरमानी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने वरील तारखेपर्यंत ही सुनावणी तहकूब केली़

Hearing on the execution of accused on July 18 | आरोपींच्या फाशीवर १८ जुलैपासून सुनावणी

आरोपींच्या फाशीवर १८ जुलैपासून सुनावणी

मुंबई : महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर १८ जुलैला सुनावणी होणार आहे़
न्या़ विजया कापसे-ताहिलरमानी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने वरील तारखेपर्यंत ही सुनावणी तहकूब केली़ अद्याप आरोपींनी या शिक्षेविरोधात अपील याचिका दाखल केलेली नाही़
गेल्या वर्षी आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली व सलीम अन्सारी या आरोपींनी छायाचित्रकार तरुणीवर या मिलमध्ये सामूहिक बलात्कार केला़ याआधी याच आरोपींनी एका टेलिफोन आॅपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता़ यासाठी दोषी धरत सत्र न्यायालयाने या तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ त्यानंतर सरकारी पक्षाने छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कारप्रकरणी या आरोपींवर फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या ३७६ (इ) या नवीन कलमाअंतर्गत आरोप निश्चित
केला़ त्यानुसार या आरोपींविरोधात स्वतंत्र साक्षीदार तपासले गेले़ त्याअंतर्गत या आरोपींचा नवीन कलमाअंतर्गत गुन्हा सिद्ध झाला व सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing on the execution of accused on July 18