शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: March 2, 2015 01:32 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे मोठे अपयश असल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे आणि आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्यात सर्वत्रच स्वाईन फ्लूचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत यातून झालेल्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांत भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक औषधींचा आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रूग्णांना योग्य तो सल्ला मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत गंभीर नाही. त्यांची निष्क्रियता यातून समोर आली असल्याचे विखे म्हणाले. स्वाईन फ्लूचे गांभीर्य लक्षात घेऊन या विभागातील संचालक, उपसंचालकांनी अद्याप कुठेही दौरे केलेले नाहीत. या आजारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या संदर्भातही त्यांनी माहिती जाणून घेतली नाही. यामुळेच स्वाईन फ्लूच्या आजाराची नेमकी वस्तुस्थिती समोर येऊ शकलेली नाही असे, विखे म्हणाले. (प्रतिनिधी)