शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

Bombay HC: 'त्या' विद्यार्थिनीच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:18 IST

Bombay High Court on Maharashtra government: विद्यार्थिनीने सोशल मीडियाद्वारे भारत सरकारवर पाकिस्तानविरुद्ध युद्ध भडकवण्याचा आरोप केला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले.

भारत - पाकिस्तान संघर्षाबाबत समाजमाध्यमावर पोस्ट करणाऱ्या पुण्यातील अभियांत्रकी महाविद्यालयातील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीला अटक केल्यावरून उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि संबंधित महाविद्यालयाची कानउघाडणी केली. 

पुण्यातील अभियांत्रकी महाविद्यालयातील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीला अटक केल्यावरून मुंबईउच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. या विद्यार्थिनीने भारत - पाकिस्तान संघर्षाबाबत समाजमाध्यमावर एक पोस्ट केली होती. मात्र, तिने चूक मान्य केली आणि माफी मागितली तरीही तिला सरकारने गुन्हेगार ठरवले. या विद्यार्थिनीवरील कारवाईची भूमिका कट्टरपंथी आहे, अशी टीका न्यायालयाने केली.

जामीन अर्ज त्वरीत निकाली काढणारन्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमाशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने विद्यार्थिनीच्या वकिलाला तिच्या जामिनासाठीचा अर्ज तातडीने दाखल करण्यास सांगितले. या विद्यार्थिनीला बुधवारी होणाऱ्या परीक्षेला बसता येईल, यासाठी हा अर्ज आम्ही आजच मंजूर करू, असेही न्यायालयाने आश्वासन दिले. 

नेमके प्रकरण काय?संबंधित विद्यार्थिनीने रिफॉर्मिस्तान' नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने भारत सरकारवर पाकिस्तानविरुद्ध युद्ध भडकवण्याचा आरोप केला. त्यानंतर विद्यार्थिनीने दोन तासांत पोस्ट काढून टाकली आणि माफी मागितली. मात्र, तरीही तिला अटक करण्यात आली. या विद्यार्थिनी सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधूनही काढून टाकण्यात आले. 

महाविद्यालयाची कानउघाडणीमहाविद्यालयाचा निर्णय मनमानी आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हणत विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिने परीक्षेला बसण्याची परवानगी आणि पुनर्नियुक्तीची मागणीही केली. यावर बोलताना न्यायालयाने म्हटले की, "शैक्षणिक संस्थेचे कार्य केवळ शैक्षणिक शिक्षण देणे नाही तर विद्यार्थ्यांना सुधारणे देखील आहे. परंतु, महाविद्यालयाने विद्यार्थिनीला समजावून सांगण्याऐवजी तिला गुन्हेगार बनवले. विद्यार्थिनीला तिची बाजू स्पष्ट करण्याची संधी द्यायला हवी होती." 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईOperation Sindoorऑपरेशन सिंदूरMaharashtraमहाराष्ट्र