शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मृत्यूच्या व्यापाऱ्यांना’ फाशी द्या

By admin | Updated: September 24, 2015 01:48 IST

मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,

मुंबई: मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी सरकारने विशेष मोक्का न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाने शिक्षेवरील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला. ७/११च्या खटल्यातील सर्व आरोपी ‘मृत्यूचे व्यापारी’ आहेत, असा उल्लेख करीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी १२ आरोपींपैकी आठ आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याने त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी विशेष न्यायालायाचे न्या. वाय. डी. शिंदे यांच्याकडे केली. ११ जुलै २००६च्या बॉम्बस्फोटा प्रकरणी विशेष न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपींना दोषी ठरवत एकाची निर्दोष सुटका केली. या बॉम्बस्फोटात १८८ लोक मृत्युमुखी पडले, तर ८०० हून अधिक जखमी झाले होते.कमल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैझल शेख, एहतेशाम सिद्दिकी, शेख आलम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, नावेद हुस्सेन खान आणि असीफ खान या आरोपींनी फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. तर मोहम्मद माजीद शफीक, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर अहमद शेख यांना आठ जणांपेक्षा वेगळी शिक्षा देण्यात येऊ शकते, असे म्हणणे अ‍ॅड. ठाकरे यांनी न्या. शिंदे यांच्यासमोर मांडले. या चारही जणांना दया दाखवण्याचा विचार न्यायालय करीत असेल तर त्यांनी केलेला गुन्हा पाहता, त्यांना अनेक वेळा जन्मठेप होऊ शकेल. त्यामुळे या चारही जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी किंवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी अ‍ॅड. ठाकरे यांनी विशेष न्यायालयाकडे केली. ज्या वेळेत बॉम्बस्फोट करण्यात आला त्या वेळी चर्चगेट ते विरार यादरम्यान लोकलमध्ये गर्दी असते, हे सगळ्यांना माहीत आहे. हे बॉम्बस्फोट जाणूनबुजून संध्याकाळी आणि गर्दीच्या वेळी करण्यात आले. कारण याच वेळी अनेक लोकांचा जीव जाईल याची संपूर्ण कल्पना आरोपींना होती. आरोपींच्या या योजनेवरूनच त्यांची मानसिकता स्पष्ट होते, असाही युक्तिवाद अ‍ॅड. ठाकरे यांनी केला.