शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ फलकावर कर्नाटकात हातोडा

By admin | Updated: July 26, 2014 01:48 IST

मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतीक असलेला येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ हा फलक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी हटविण्यात आला.

बेळगाव : मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतीक असलेला येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ हा फलक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी हटविण्यात आला. फलक हटविल्यामुळे येळ्ळूर गावात तणावपूर्ण शांतता असून, संपूर्ण सीमाभागातील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
येळ्ळूर येथील फलाकासमोर साडेदहा वाजता अनेक गाडय़ा, पोलिसांचा फौजफाटा आणि अधिकारी जमले. पावणो अकरा वाजता येळ्ळूर गावाची सीमा सील करण्यात आली. प्रांताधिकारी शशिधर बगली यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिका:यांच्या सूचनेनुसार ‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ फलक हटविणार असल्याचे सांगितले. 
यावेळी जमलेल्या मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. फलकावर लावण्यात आलेला भगवा ध्वज दोन युवकांनी आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्याप्रमाणो तो ध्वज त्यांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर फलकावर हातोडा पडला.  (प्रतिनिधी)
 
शिवसेनेने कर्नाटकच्या पाच बसेस फोडल्या
कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार ‘महाराष्ट्र राज्य -येळ्ळूर’ हा फलक हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिकांनी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या कर्नाटकच्या पाच बसेस फोडल्या. या घटनेची नोंद उशिरार्पयत पोलीस स्थानकात झालेली नव्हती.
 
बेळगाव जिलच्या सीमावर्ती भागात ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’चा फलक कर्नाटक सरकारने कडक पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी हटविला़ पोलिसांच्या या कृतीमुळे सीमावासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आह़े
 
सीमाभागातील ‘येळ्ळूर’ गावचा फलक हटविल्याच्या निषेर्धात शिवसेना कार्यकत्र्यानी कर्नाटक राज्य परिवहनच्या कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील उभ्या असलेल्या बसेस फोडल्या.
 
सोमवारी बेळगावात मोर्चा
आमदार संभाजी पाटील, मराठी नगरसेवक आणि नेतेमंडळी नंतर येळ्ळूर गावात दाखल  झाली. त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हजारांवर ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
अशी झाली मराठी फलकावर कारवाई
गोकाक येथील भीमाप्पा गडाग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाने हा फलक हटवून सोमवारी त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शुक्रवारी हा फलक हटविण्यात आला. येळ्ळूर हे गाव प्रत्यक्षात कर्नाटकमध्ये असूनही ते महाराष्ट्रात असल्याचे निदर्शित करणारा फलक चुकीचा आहे व तो अनधिकृतपणो लावण्यात आला आहे, असा आक्षेप गडाग यांनी घेतला आहे.
 
मुंबईत मुख्यमंत्री निवासासमोर धरणो आंदोलन
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणो धरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील लाल-पिवळा ङोंडा का काढला जात नाही? उच्च न्यायालयाने आदेश देऊनही मराठी भाषिकांना मराठीत कागदपत्ने दिली जात नाहीत? अशी प्रतिक्रिया येळ्ळूर ग्रामस्थांनी व्यक्त केली.
 
जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणो कन्नड ध्वज फडकत असून मराठी भाषिकांना एक न्याय, तर कन्नडिगांना दुसरा  असा दुजाभाव कर्नाटक सरकार करत आहे. लवकरच आम्ही मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणो आंदोलन करून कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारने जाब विचारून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहोत.  - संभाजी पाटील, आमदार, बेळगाव
 
सीमाभागातील मराठी भाषिकांना  सरकारी परिपत्रके मराठी भाषेत दिली जावीत, असा उच्च  न्यायालयाच्या निकाल असतानाही सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. मात्र, मराठी फलक काढण्याच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करून सरकार सोयीनुसार  कायदा वापरते. 
 - टी. के. पाटील, उपाध्यक्ष,  महाराष्ट्र एकीकरण समिती
 
येळ्ळूर येथील फलक काढून टाकण्याची कर्नाटक सरकारने केलेली कारवाई अन्याय्य आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही कर्नाटक बसेस फोडल्या.  कर्नाटक शासन सीमा बांधवांवर करीत असलेला अन्याय त्यांनी थांबवावा, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन शिवसेना स्टाईलने करू.
- राजेश क्षीरसागर,  आमदार, शिवसेना
कर्नाटक सरकारने सीमाबांधवांचा हा छळ थांबवून ही आडमुठी भूमिका सोडून भालकी, बिदर, बेळगाव, निपाणी आदी सीमाभाग महाराष्ट्राला जोडावा.
- प्रा. एन. डी. पाटील, 
ज्येष्ठ नेते, शेतकरी कामगार पक्ष