शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरच्या योजनेवर दीड कोटी खर्च

By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST

सातही दिवस २४ तास पाणी देण्याच्या योजनेखाली प्राधिकरणने तब्बल दीड कोटी रुपयांची वाट लावली. ‘२४ बाय सात’ असे गोंडस नाव देवून योजना जाहीर केली. मात्र गत तीन वर्षांपासून यवतमाळकर या

जीवन प्राधिकरण : तीन वर्षांपासून २४ तास पाण्याची प्रतीक्षाचविलास गावंडे - यवतमाळसातही दिवस २४ तास पाणी देण्याच्या योजनेखाली प्राधिकरणने तब्बल दीड कोटी रुपयांची वाट लावली. ‘२४ बाय सात’ असे गोंडस नाव देवून योजना जाहीर केली. मात्र गत तीन वर्षांपासून यवतमाळकर या योजनेच्या प्रतिक्षेतच आहेत. ही रक्कम नेमकी कशावर खर्च झाली हा मात्र आता संशोधनाचा विषय झाला आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या या विभागाने कागदावरच असलेल्या या योजनेवर इतका खर्च कसा केला, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने एक मॉडेल म्हणून ‘२४ बाय सात’ योजना जाहीर केली. सुजल निर्मल अभियानांतर्गत योजनेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यानुसार अमरावती येथे चार झोनमध्ये सुमारे आठ कोठी ७४ लाख रुपये खर्च करून योजनेला मूर्त रूप देण्यात आले. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा करतानाच यवतमाळ शहरासाठीही योजना आखण्यात आली. तीन वर्षांपूर्वी यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला. शहराची पाण्याची गरज आणि आवश्यक पाणीसाठा याचा कुठलाही विचार न करता योजनेला हात घालण्यात आला. आजच्या स्थितीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ‘२४ बाय सात’ची घोषणा आणि कारवाई करतानाही हीच परिस्थिती होती. तरीही प्राधिकरणने या योजनेचा बिगुल फुंकला. यवतमाळ शहरासाठी ही योजना यशस्वी होणार की नाही याचा कुठलाही विचार न करता खर्चाचा सपाटा सुरु ठेवला. योजनेसाठी ३ मार्च २०१४ पर्यंत एक कोटी ४३ लाख २३ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. हा खर्च नेमका कुठल्या कामासाठी झाला, याचा हिशेबही अतिशय तकलादू आहे. केवळ टेबल-खुर्च्या, लॅपटॉप यावरच एवढा खर्च झाला असावा काय, याविषयी साधार शंका व्यक्त केली जात आहे.‘२४ बाय सात’ पद्धतीने पाणीपुरवठ्यासाठी सद्यस्थितीतील जलवाहिन्या बदलणे किंवा नवीन जलवाहिण्या टाकणे, तांत्रिकदृष्टया परिपूर्ण नकाशे अशी कामे सुचविण्यात आली होती. या कामांसाठी दोन कोटी २८ लाख २८ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र सुचविलेल्यापैकी वास्तवात किती कामे झाली हे सांगण्यासाठी कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. तथापि, या योजनेवर १ कोटी ४३ लाख २३ हजार रुपयांचा खर्च मार्च २०१४ पर्यंत दाखविण्यात आला आहे. ही रक्कम नेमकी कशावर खर्च करण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. प्राधिकरण आर्थिक अडचणीत असताना जनतेचा पैसा पाण्यासारखा वापरण्यात आला. या प्रकाराला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.