शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळवला

By admin | Updated: September 12, 2014 02:54 IST

महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजपाने राज्यात येऊ घातलेला नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल पोलिसिंग अकादमीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये पळवला

मुंबई : महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजपाने राज्यात येऊ घातलेला नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल पोलिसिंग अकादमीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये पळवला आहे. विशेष म्हणजे, २६/११च्या घटनेनंतर सागरी सुरक्षेसाठीची उपाययोजना म्हणून मुंबईत ही अकादमी स्थापना करण्यात येणार होती. महाराष्ट्राचा प्रस्ताव का नाकारला याची कोणतीच कारणे, केंद्र सरकारने दिलेली नाहीत. फक्त ही अकादमी गुजरातला मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा महाराष्ट्रावर आणि विशेषत: मुंबईच्या सुरक्षेच्या बाबतीत केंद्राने अन्याय केला असल्याचे सांगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.कोणतेही कारण नसताना देशाच्या एका कोपऱ्यात ही अकादमी का नेली? महाराष्ट्रात उभारायचीच नव्हती, तर राज्याकडे जमीन का मागितली? केंद्राच्या अधिकऱ्यांनी पालघर येथील जमीन मंजूर केल्यावरही का नाकारली? अकादमी शहराजवळच पाहिजे हा निकष असेल, तर द्वारका हे काय इतर राज्यांच्या तुलनेत मध्यवर्ती शहर आहे का, असे सवालही पाटील यांनी उपस्थित केले.या प्रकल्पामुळे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्याच्या सागरी सुरक्षा करणाऱ्या यंत्रणांना प्रशिक्षण मिळणार होते. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयानेही अकादमी गुजरातेत नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी द्वारका जिल्ह्यातील पिंडारा (देवभूमी) या गावी २५० एकर जमिनीवर आता ही अकादमी उभी राहील. (प्रतिनिधी)