शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोठडी मृत्यू टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना

By admin | Updated: August 24, 2014 01:07 IST

पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांकरिता मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचनांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

राजेश निस्ताने - यवतमाळ पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांकरिता मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचनांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आलेल्या एका पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणानिमित्त या सूचना गेल्या आठवड्यात जारी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस रखवालीतील मृत्यू टाळण्यासाठी आता पोलिसांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. मानवाधिकार आयोगाने आरोपींसाठी मार्गदर्शक तत्वे यापूर्वीच जारी केली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात दर्शनी भागाला ती लावलेलीही आहेत. त्याची अंमलबजावणी होते. परंतु पोलीस कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पहिल्यांदाच मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यापूर्वी अशाप्रकारे मृत्यूच्या शेकडो घटना घडल्या आहेत. त्यात कित्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावर खटले चालले, कित्येकांना जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेला सामोरे जावे लागले. अनेक ठाणेदार, पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्याच ठाण्याच्या ‘लॉकअप’मध्ये राहण्याचा दुर्दैवी प्रसंग आला.