शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहि‍णींना सरकारचा दिलासा! केवायसी दुरुस्ती करण्याची मुदत वाढवली, आता किती दिवस शिल्लक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:58 IST

Ladki Bahin Yojana e-KYC latest Updat: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या केवायसी दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. 

Ladki Bahin Yojana e-KYC Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या, पण ३१ मार्चपूर्वी केवायसी दुरुस्ती पूर्ण न करू शकलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. आता लाभ घेण्यासाठी महिलांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती बुधवारी दिली. 

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ दिली असल्याचे सांगितले. 

केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ का देण्यात आली?

एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये तटकरे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे." 

केवायसी करण्याची शेवटची संधी

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून केवायसी दुरुस्ती अनिवार्य केली आहे. बोगस लाभार्थी आणि अपात्र लाभार्थींना गाळण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केवायसी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे.

३१ मार्चपर्यंत केवायसी दुरुस्ती करण्याची वेळ सरकारने दिली होती. पण, दिलेल्या कालावधीतनंतरही काही महिला केवायसी दुरुस्ती करू न शकल्याने आता मुदतवाढ दिली गेली आहे. केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for 'Ladki Bahin' beneficiaries: KYC update deadline extended!

Web Summary : The Maharashtra government extended the e-KYC update deadline for the 'Ladki Bahin' scheme to April 30, 2026. This provides relief to women who missed the original March 31 deadline. The extension was granted following requests and weather-related disruptions, offering a final opportunity for KYC completion.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरेgovernment schemeसरकारी योजनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार