शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

टिवटिव करण्यातच सरकारची आघाडी

By admin | Updated: October 9, 2015 01:33 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या ३१ आॅक्टोंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या काळातील सरकारचा कारभार दृष्टिहीन असल्याचेच दिसून आले. केवळ टिष्ट्वटरवर टिवटिव करण्यातच सरकारने पहिले वर्ष घालविल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. तटकरे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा शब्द देऊनही मागच्या रब्बी व खरीप हंगामासाठी सरकारने नुकसानभरपाई दिली नाही. मुख्यमंत्र्यांकडे वारंवार विनंती करूनही मदत केली नाही. मागच्या वर्षभरात किमान आधारभूत किमतीवर सरकारने किती खरेदी केली, हे सरकारने सांगावे,’ असा सवाल करतानाच ‘दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना जुन्या रोजगार योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला काम देण्यात यावे,’ असेही तटकरे म्हणाले. पेट्रोल, डिझेलपासून ते तुरडाळीपर्यंतच्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. तुरडाळीचा तुटवडा झाला असताना आम्ही १५० रूपयापर्यंत भाव रोखले होते. युती सरकारने मात्र भाव दोनशेपर्यंत नेऊन ठेवले. इतर राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात कमालीची घट झाली असताना महाराष्ट्रात उलटे घडत आहे. सणासुदीच्या तोंडावर जनतेला महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. जाहिरनाम्यात विकासाचे दृष्टिपत्र मांडणाऱ्या सरकारने दृष्टिहीन कारभार केल्याची टीका तटकरेंनी केली.राज्यभर करणार आंदोलने वर्षभरात युती सरकारचे अनेक घोटाळे, गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी २५ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राज्याच्या सर्व जिल्हा, तालुका स्तरावर आंदोलने करणार आहे, तर ३१ आॅक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथील जांबोरी मैदानावर सरकारच्या गैरकारभाराचा पंचनामा करण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.