शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

सरकारी नोकर भरतीवर निर्बंध!

By admin | Published: June 04, 2015 4:56 AM

कर्मचारी वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने नोकर भरतीवर निर्बंध आणले असून, केवळ १० संवर्गांतील रिक्त पदांपैकी ७५ टक्के व अन्य संवर्गांतील

मुंबई : कर्मचारी वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने नोकर भरतीवर निर्बंध आणले असून, केवळ १० संवर्गांतील रिक्त पदांपैकी ७५ टक्के व अन्य संवर्गांतील केवळ ५० टक्केच पदे भरता येतील, असा आदेश बुधवारी काढला. शासनाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक श्वेतपत्रिका सादर करताना वेतनावरील खर्च मर्यादित करण्याचे सूतोवाच केले होते. दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनवाढीवरील खर्चाचा सरासरी दर हा महसुली वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये. राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा महसूल वाढीचा दर ९.६४ टक्के इतका अपेक्षित धरण्यात आला आहे. त्या मर्यादेतच नवीन पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक, पोलीस शिपाई, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारिका, पशुधन परीवेक्षक, मत्स्य व्यवसाय विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, वनरक्षक, कृषी सहाय्यक, जलसंपदा विभागाचे  कनिष्ठ अभियंता या संवर्गात एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्क्यांपर्यंत पदे भरता येणार आहेत. सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांपैकी ५०% किंवा एकूण संवर्गाच्या ४% यापैकी जे कमी असेल तेवढीच पदे भरता येतील. उर्वरित पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहील. या समितीपुढे प्रस्ताव सादर करताना संबंधित विभागाने सध्या वेतनावर होणारा खर्च व त्यात होणारी संभाव्य वाढ याचा आढावा घेऊनच प्रस्ताव सादर करावा लागेल. सिडको, एमएमआरडीए, पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (पीएमआरडीए), नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी), नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) आणि पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन (पीएमआरसीएल) यासारख्या आर्थिक सक्षम स्वायत्त संस्थांना तसेच ज्या आस्थापनांचे पगार केंद्राच्या अनुदानातून होतात त्यांमध्ये नवीन पदनिर्मिती करण्यास बंदी नसेल.