शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वीज सुविधांचा ६५ करोडचा प्रस्ताव शासनदरबारी सादर!

By admin | Updated: July 21, 2016 18:06 IST

सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महावितरणने ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केला.

सुनील काकडे

वाशिम : सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी महावितरणने ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार केला. त्यास मुंबईच्या ह्यडिस्ट्रीब्युशनह्ण विभागाने मंजूरात देवून अंतीम निर्णय आणि निधीसाठी शासनदरबारी हा प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, निधी प्राप्त होताच अकराही बॅरेजेसस्थळी विजेच्या सुविधा उभ्या केल्या जातील, अशी माहिती अधीक्षक अभियंता बी.आर.बनसोडे यांनी गुरूवार, २१ जुलै रोजी दिली.जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर तब्बल ७१६.४२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अकराही बॅरेजेसची कामे सद्या पूर्ण झाली असून त्यात मोठा जलसाठा देखील निर्माण झाला आहे. या प्रकल्पांमुळे वरूड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळी, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर या पैनगंगा नदीकाठच्या गावांमधील सुमारे १० हजार शेतकऱ्यांना खरिप, रबी हंगामासह उन्हाळी पिकांकरिता देखील पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे.

तथापि, एकीकडे सिंचनाच्या बाबतीत आशादायक वातावरण निर्मिती झाली असताना दुसरीकडे मात्र प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उद्भवलेल्या विजेच्या समस्या वाढतच चालल्या होत्या. पाणी उपलब्ध असले तरी त्याचा वापर सिंचनाकरिता करायचा झाल्यास कृषीपंपांना पुरेशी वीज मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुषंगाने अकराही प्रकल्पक्षेत्रात वीज उपकेंद्र उभारून ठिकठिकाणी रोहित्रांची उपलब्धी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.

तद्वतच हा प्रश्न निकाली निघावा, यासाठी ह्यलोकमतह्णनेही वेळोवेळी सकारात्मक लिखान केले. त्याची दखल घेत महावितरणने बॅरेजेस प्रकल्प परिसरात विजेच्या भौतिक सुविधा उभ्या करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा ६५.६५ करोड रुपयाचा प्रस्ताव तयार करून महावितरणच्या ह्यडिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटह्णकडे पाठविला.  तेथून या प्रस्तावाला ह्यहिरवी झेंडीह्ण मिळाली असून आता शासनाच्या अंतीम मंजूरीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. तथापि, जिल्ह्यातील विद्यमान खासदार, आमदारांनी शासनाकडून हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून अपेक्षित निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.