शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 05:57 IST

सोलरचा वापर करा, असे सुचविण्यात येत होते. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मुंबई :  वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी आणि आयुर्वेद  रुग्णालयातील विजेचा खर्च वाढत आहे. तो कमी करण्यासाठी रुग्णालयावर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर सोलार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सोलरचा वापर करा, असे सुचविण्यात येत होते. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पारंपरिक ऊर्जा स्रोताऐवजी सौर ऊर्जेचा वापर केल्याने विजेचा मोठा खर्च कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची  राज्यात २५ वैद्यकीय, तीन दंत, सहा आयुर्वेद  आणि एक होमिओपॅथी कॉलेज आहे. या महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणावर विजेचा खर्च येतो. शासकीय रुग्णालये असल्यामुळे ३६५ दिवस २४ तास रुग्णालये गरीब रुग्णांना सेवा देत असतात.

सौर ऊर्जेवर आधारित  संयंत्राच्या उभारणीसाठी केंद्र शासनाचे नियम व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि  महाराष्ट्र ऊर्जा  विकास अभिकरण  (महाऊर्जा) यांच्या विहित तांत्रिक मोजमापे (टेक्निकल स्पेसिफिकेशन) व मानांकनानुसार करण्यात यावी. प्रकल्प राबविताना शासनावर आर्थिक भार येणार नाही याची वैद्यकीय आयुक्तांनी  खातरजमा करावी, असे विभागाने म्हटले होते.

आयुक्तांना अधिकार

रुग्णालय इमारतीच्या गच्चीवर ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने तांत्रिक बाजू तपासून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेत तसेच कराराच्या कालावधीत नवीन संस्थांचा अंतर्भाव करणे किंवा संस्था कमी करण्याचे अधिकार शासन मान्यतेने आयुक्तांना असतील.

वीज बिल कमी होणार

वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसासार,  पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यामुळे आतापर्यंत येणारा मोठा खर्च सौर ऊर्जेमुळे कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्वीच राबविणे गरजेचे होते.