शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य खात्यातील डॉक्टरांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 07:00 IST

५० टक्के रुग्णवाहिका बदलणार; विधानसभेत आरोग्य विभागाचे ऑपरेशन

मुंबई : सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधील विशेषज्ञ डॉक्टरांची ७० टक्के रिक्त पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील, एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत कर्ज घेऊन आणि १३०० कोटी रुपये खर्चून आरोग्य केंद्रांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील आणि राज्यातील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्य विभागाशी संबंधित चार प्रश्नांवर चर्चा झाली. अमिन पटेल, शेखर निकम, राणा जगजीतसिंह पाटील आणि विकास ठाकरे यांनी हे प्रश्न उपस्थित केले. महाड, जि.रायगड येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी भूलतज्ज्ञांची नेमणूक तत्काळ केली जाईल हे सांगतानाच गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी गरज नसताना ट्रॉमा केअर सेंटर देण्यात आल्याचे स्पष्ट करून टोपे म्हणाले की आता प्राधान्यक्रम ठरवून हे सेंटर पूर्ण केले जातील आणि तिथे कर्मचारीवर्गही दिला जाईल.राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यातून ज्या आरोग्य केंद्रांच्या इमारती ७५ टक्के पूर्ण झाले आहे ते आधी पूर्ण केले जाईल. पूर्व विदर्भातील आरोग्य केंद्रांमध्ये विशेषज्ञांची ९१३ पदे रिक्तअसून त्यातील ५७४ पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.धुळे महिला रुग्णालयाला निधी देणारधुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयाला आवारात १०० खाटांच्या महिला रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये रुग्णालयासाठी निधीची तरतुद केली जाईल आणि यावर्षी रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. यासाठी प्रयत्न केले जातील, असे टोपे यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :doctorडॉक्टर