शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर सोन्यावरही लागेल प्राप्तिकर

By admin | Updated: September 21, 2015 02:00 IST

घराघरांतील सोने बाहेर काढून त्यावर निश्चित स्वरूपाचा परतावा देणारी सुवर्ण बचत योजना सरकारने जरी सादर केली असली तरी, या योजनेअंतर्गत सोन्याची ठेव ठेवण्याचे जे निकष सादर करण्यात आले आहेत,

मनोज गडनीस, मुंबईघराघरांतील सोने बाहेर काढून त्यावर निश्चित स्वरूपाचा परतावा देणारी सुवर्ण बचत योजना सरकारने जरी सादर केली असली तरी, या योजनेअंतर्गत सोन्याची ठेव ठेवण्याचे जे निकष सादर करण्यात आले आहेत, त्यानुसार ठेवी रूपाने जमा करण्यात येणाऱ्या सोन्याचा स्रोत ग्राहकाला स्पष्ट करावा लागणार आहे. तो स्पष्ट न करू शकल्यास ग्राहकाला त्या सोन्याच्या मूल्यावर त्या तुलनेत इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. 15 सप्टेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात कार्यालयीन पत्रक काढून सोन्याच्या या योजनेवर लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भारतीयांची सोन्याची हौस आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेली सोने खरेदीची परंपरा लक्षात घेता या निकषांपेक्षा कित्येकपट अधिक सोने लोकांच्या घरी असेल. तसेच, त्यावर जर करभरणा करावा लागणार असेल तर या योजनेत सहभागी होण्यास फारशी पसंती मिळणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.विवाहित स्त्रीला ५०० ग्रॅमपर्यंत सोन्याचा स्रोत जाहीर न करता या योजनेत सहभागी होता होईल. यापेक्षा १ ग्रॅम जरी अधिक सोने असेल तरी त्या सोन्याच्या खरेदीचा संपूर्ण स्रोत देतानाच त्यावर प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार करभरणा करावा लागेल. ज्या स्त्रीचा विवाह झालेला नाही अशा स्त्रीला २५० ग्रॅमपर्यंत सोने ठेवता येईल; त्यावरील सोन्याचा स्रोत जाहीर करतानाच त्यावर करभरणा करावा लागेल. पुरुषांकरिता ही मर्यादा १०० ग्रॅम आहे. यावरील सोन्याकरिता स्रोत जाहीर करतानाच करभरणा करावा लागेल.