शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाला निघताय? या मार्गावर अनेक रेल्वेगाड्या धावतील उशिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:03 IST

South Raiway: दक्षिण रेल्वेकडून थोकूर-जोकाटेदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ‘प्री-एनआय ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. दुहेरीकरणाचे काम १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असल्याने या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित  किंवा आंशिक रद्द करण्यात येतील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई : दक्षिण रेल्वेकडून थोकूर-जोकाटेदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ‘प्री-एनआय ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. दुहेरीकरणाचे काम १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असल्याने या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित  किंवा आंशिक रद्द करण्यात येतील, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

या ब्लॉकदरम्यान थोकूर आणि जोकाटे यार्ड परिसरात रुळांच्या कनेक्शन आणि नवीन पॉइंट्स बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. बदलेल्या वेळपत्रकानुसार १४ नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या बंगळुरू-कारवार (१६५९५), त्रिवेंद्रम उत्तर-भावनगर (१९२५९) व लोकमान्य टिळक-त्रिवेंद्रम (१६३४५) या गाड्या अनुक्रमे ८०, १५ आणि २० मिनिटांनी नियंत्रित राहतील.  तसेच १५ नोव्हेंबर रोजी पोरबंदर-त्रिवेंद्रम उत्तर (२०९१०) गाडी २० मिनिटांनी नियंत्रित राहील, तर १६ नोव्हेंबर रोजी जामनगर-तिरुनेलवेली (१९५७८) गाडी ३० मिनिटांनी उशिराने धावेल.  १७ नोव्हेंबर रोजी या जामनगर-तिरुनेलवेली गाडीला १०० मिनिटे उशीर होईल, तसेच बंगळुरू-कारवार गाडीला २० मिनिटांचा उशीर होईल.

१८ नोव्हेंबर रोजी कोइम्बतूर-जबलपूर (०२१९७) आणि एर्नाकुलम-पुणे (११०९८) या गाड्या अनुक्रमे रात्री ८:०५ व ९:५० वाजता तीन तास उशिराने सुटतील. या दिवशी इतर काही गाड्या १५ ते १५० मिनिटे नियंत्रित राहतील. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मंगळूर (१२१३३) गाडी सुरतकल येथेच थांबवून पुढे रद्द केली जाईल, तर उलट दिशेची १२१३४ मंगळूर-मुंबई गाडी सुरतकलहून सुरू होईल. तसेच मुरुडेश्वर-बंगळुरू (१६५८६) आणि पुणे-एर्नाकुलम (११०९७) या गाड्याही अनुक्रमे १२० व ५० मिनिटांनी उशिरा धावतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Train Travel Alert: Expect Delays on This Route

Web Summary : Konkan Railway announces train delays, rescheduling, and cancellations between November 12-23, 2025, due to doubling work near Thokur-Jokatte. Several trains will be regulated or partially cancelled. Mumbai-Mangalore Express will be cancelled at Suratkal on November 23.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे