शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देव तरी त्यास कोण मारी ! मेन लाईनची तार अंगावर पडूनही मुलगी जिवतं

By admin | Updated: September 5, 2016 14:50 IST

शहरातील मंजरथ रोड वरील दत्त कॉलनी विभागात विजवितण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज वाहक करणारी मुख्य तार घरासमोर खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलीच्या अंगावर पडली

- ऑनलाइन लोकमत
वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार
माजलगाव, दि. ५  - शहरातील मंजरथ रोड वरील दत्त कॉलनी विभागात विजवितण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज वाहक करणारी मुख्य तार घरासमोर खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलीच्या अंगावर पडली. सदरील मुलगी गंभीर रित्या जखमी झाली यातुन मुलीचे दैव बलवत्तर होते म्हणून ती वाचली. शहरातील बहुतांश भागात वीज वाहक तारा या जीर्ण झाल्या आहेत.
 
गणपतीच्या आगमनाची तयारी होत असताना अचानक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरावरील वीज वाहक करणारी मेंन लाईटची तार श्रद्धा संतोष शिंदे या पाचवी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर पडली. यामुळे मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. दत्त कॉलनी मध्ये अनेक ठिकाणी विद्यूत तारांना जोड देऊन बसवण्यात आलेल्या आहेत.
 
 त्यातूनच आज या मुलीच्या अंगावर हि जोड दिलेली तार पडली. सदरील शाळकरी मुलीचे दैव बलवत्तर   म्हणून हि मुलगी अंगावर मुख्य तार पडून सुद्धा केवळ गंभीर रित्या जखमी झाली. तारेने मुलीला लवकर सोडल्याने मोठा होणारा अनर्थ टळला. श्रद्धा शिंदे वर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्य असलेल्या 3 मेन लाईनपैकी 2 तारा या मुलीच्या अंगावर पडल्या यात तिच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यावर आणि चेहऱ्यावर जखमा झालेल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मुलीचा जीव जाता जाता राहिला. या आधी सुद्धा अशा घटना होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे पण गेंड्याची कातडी पांघरलेले या वीज वितरण कंपनीला आणखी किती जीव गेल्या नंतर जाग येणार असा प्रश्न शहरवासीय उपस्तीत करीत आहेत.
 
वीज वितरण कंपनी बळी गेल्यावरच जागी होणार का 
शहरातील अनेक ठिकाणी अश्या जोड दिलेल्या तारा ठळक डोळ्यासमोर दिसून येतात,काही ठिकाणी तर अक्षरशः घरांमधून वीज वितरण ची तार गेलेल्या आहेत सदरील ठिकाणी नागरिकांना जाताना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागते अशी परिस्तिथी असताना अनेकांच्या जीवांना धोका आहे आगामी काळात जर अशी घटना घडली तर आश्चर्य वाटायला नको कारण जीव गेल्या शिवाय वीज वितरण कंपनीला जग येणार नाही असे बोलले जात आहे.
 
मुख्य रस्त्यावरही हीच बोंब
 शहरातील एकमेव असणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुमारे 100 रावर वीज वितरणाचे खांब आहेत ते सुद्धा अर्ध्या रस्त्यात च आहेत यातून गेल्या काही महिन्यापूर्वी ऐन शिवाजी चोकात एक दुचाकी गाडी वीज वाहक करणारी तार पडून भस्म झाली संपूर्ण तारी या जीर्ण झालेल्या असून रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांत हि एकप्रकारे मनात जीवाची भीती घेऊनच चालावे लागते..