शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस लाखांचा ऐवज केला हस्तगत

By admin | Updated: December 29, 2014 05:17 IST

: डोंबिवलीच्या मानपाडा भागातील कोठारी कम्पाउंडमधील घाऊक बाजाराचे गोदाम लुटण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या सशस्त्र टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती

ठाणे : डोंबिवलीच्या मानपाडा भागातील कोठारी कम्पाउंडमधील घाऊक बाजाराचे गोदाम लुटण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या सशस्त्र टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने अलीकडेच जेरबंद केले होते. या टोळीकडून शस्त्रसामग्रीही हस्तगत करण्यात आली होती. याच टोळीने भिवंडीतील एका कंटेनरसह ४० लाखांच्या ऐवजाचाही अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. हा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.दीपक यादव रा. भिवंडी, चंद्रेश बिंद रा. मानखुर्द, सलाऊद्दीन खान रा. कुर्ला, विश्वनाथ बिंद रा. भिवंडी आणि जावेद खान रा. कुर्ला अशी अटक केलेल्या टोळीतील दरोडेखोरांची नावे आहेत. कोठारी कम्पाउंडमधील मुकेश ट्रेडिंग कंपनी या दुकानात ते दरोडा घालणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार, या दरोड्यापूर्वीच पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने त्यांना ११ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा.च्या सुमारास जेरबंद केले होते. घेवारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारी, अनिल भवारी, उपनिरीक्षक वसंत कांबळे, हवालदार गोविंद सावंत, सुरेश कदम आणि जयकर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर पोलीस ‘चौकशी’त त्यांनी आणखी काही गुन्हे कबूल केले. ही टोळी मूळची उत्तर प्रदेशातील असून दीपक यादव हा कोणत्याही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे बदली ड्रायव्हर म्हणून जायचा. नंतर, दीपकसह त्याचे इतर साथीदार मालाने भरलेला कंटेनर किंवा ट्रक अपेक्षित ठिकाणी नेण्याऐवजी दिल्ली, पानिपत, राजस्थान या भागात नेऊन त्यातील लाखोंचा माल विकून पसार होत. (प्रतिनिधी)