शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मिरा-भार्इंदरला ५ एमएलडी पाणी द्या!

By admin | Updated: May 19, 2016 04:11 IST

मुंबई महापालिकेकडून १९६७ पासून मीरा-भार्इंदरला होत असलेला पाच एमएलडी पाणीपुरवठा चार वर्षापासून बंद आहे.

भार्इंदर : मुंबई महापालिकेकडून १९६७ पासून मीरा-भार्इंदरला होत असलेला पाच एमएलडी पाणीपुरवठा चार वर्षापासून बंद आहे. तो पूर्ववत होण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी मुंबई पालिकेकडे पाठपुरावा करुनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले आहे.ग्रामपंचायतीच्या काळात मुंबई पालिकेकडून मिरा-भार्इंदरच्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली शहरातील औद्योगिक वसाहतींसह हायवे पट्यातील मोठ्या उद्योगांना प्रत्येकी एक आणि तबेले, हॉटेल यांना अर्धा असे एकूण पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. महामार्गाखाली स्वतंत्र जलवाहिनी होती. चार वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रुंदीकरणासाठी रस्ते खोदले. त्यात जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने मुंबई पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत खंडित होणार असल्याची भावना स्थानिक प्रशासनाची झाली होती. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पालिकेने शहराला होणारा पाणीपुरवठा सुरु न करता उलट नुकसान झालेली जलवाहिनी स्वखर्चातून दुरूस्त करण्याची सूचना मिरा-भार्इंदर पालिकेला केली. त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाने ही जलवाहिनी टाकण्यासाठी तब्बल ७० लाख खर्च केले. हे काम मार्च २०१५ मध्ये पूर्ण झाले. त्याची पाहणी दोन्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा सुरु होण्याची चिन्हे असतानाच मुंबई पालिकेने खो घातला आहे. हे पाणी शहराला मिळावे, यासाठी पाटील यांनी मुंबई पालिकेच्या जलअभियंत्यांना निवेदन दिले. महापौर गीता जैन यांनीही पत्रव्यवहार केला. परंतु,शहराला अद्याप पाच एमएलडी पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. पाणीपुरवठा त्वरित सुरु करावा अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशाराही पाटील यांनी दिला होता. (प्रतिनिधी)