शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर गिरीश महाजनांची दिलगिरी, चौफेर टीकेनंतर महाजनांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 12:28 PM

दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.  

मुंबई- दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.  मी केलेल्या विधानाबदद्ल मला खंत असल्याचं स्पष्टीकरणही गिरीश महाजन यांनी दिलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या व्यक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी माफीनामा दिला आहे. 

महिलांबद्दल वक्तव्य करणं यात माझी चूक झाली असून मी नकळतपणे बोललो, त्यामुळे सगळ्या महिलांची मी माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. 

काय म्हणाले होते गिरीश महाजन ? विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला. शहादा येथे सातपुडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी पश्चिम महाराष्ट्रात विविध मद्याची नावं स्त्रीवाचक असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे त्यामुळे सातपुडा साखर कारखान्यानेही त्यांच्या ब्रँडचे नाव ‘महाराणी’ करावं, असा सल्ला दिला.साखर कारखान्यांच्या मद्यार्क निर्मिती ब्रँडची नावे भिंगरी, ज्युली असे असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे. स्त्रीवाचक नावे असलेल्या गुटखा उत्पादनांचा खपही वाढतो आहे, असंही ते म्हणाले.

महाजन यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेधराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी महाजन यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. गिरीश महाजन यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी पुण्यात केली. तर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे महाजन यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्या प्रतिमेला चपला मारून तसंच दारुच्या रिकाम्या बाटल्या फोडून निषेध व्यक्त केला.