शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जीसीए घोटाळा : माजीमंत्री नार्वेकरची पोलिसांकडून चौकशी

By admin | Updated: June 29, 2016 17:38 IST

माजी मंत्री व अनेक वर्षे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहिलेले दयानंद नार्वेकर यांची गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून दोन तास चौकशी केली

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २९ : माजी मंत्री व अनेक वर्षे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहिलेले दयानंद नार्वेकर यांची गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून दोन तास चौकशी केली. जीसीएतील ३.१३ कोटी रुपयांच्या निधी अफरातफरी या नार्वेकर यांच्या कारकिर्दीतच घडल्या होत्या. वारंवार समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिलेले नार्वेकर हे तीसऱ्या समन्साला प्रतिसाद देताना सकाळी पणजी येथील आर्थिक गुन्हा विभागाच्या कार्यालयात हजर राहिले. पोलीस निरीक्षक प्रसन्न भगत आणि निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी त्याची चौकशी करून जबानी नोंदवून घेतली. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कॉंग्रेस राजवटीत एकदा वित्तमंत्री व एकदा आरोग्यमंत्री ही पदे भुषविलेले नार्वेकर हे प्रदीर्घकाळ जीसीएचे अध्यक्षपदी होते. या घोटाळ््यात अटक करण्यात आलेले जीसीएचे विद्यमान अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला हे त्यांच्या नेतृत्वाखालील समित्यांवर होते. असे असतानाही अनाधिकृत बँक खाते खोलण्यासाठी देसाई यांनी अध्यक्ष म्हणून तर फडके यांनी सचीव म्हणून स्वाक्षरी केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यासाठी कागदोपत्री पुरावे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. तिघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि १० दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांना पणजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीनवर मूक्त केले होते.