शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्येचे जळगाव कनेक्शन? कोल्हापूर व कर्नाटक गुप्तचर यंत्रणेचे पथक शहरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 05:14 IST

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे.

जळगाव  - कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे. तपासासाठी कर्नाटक गुप्तचर यंत्रणा व कोल्हापूर पोलिसांची दोन पथके सोमवारी जळगावात दाखल झाली. त्यांनी कोल्हे हिल्स परिसरातील काही घरांची झडती घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बंगळुरूतील राज राजेश्वर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ सप्टेंबरलाज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या झाली होती. बंगळुरू गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची नावे समजू शकली नाहीत, मात्र कोल्हापूर पोलिसांच्या पथकात अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बावकर यांचा समावेश आहे. पथकाने सकाळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन स्थानिक पोलिसांची मदत मागितली. पथकाने तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची भेट घेतली. दोन पोलीस कर्मचारी सोबत घेऊन पथकाने कोल्हे हिल्स परिसर गाठले. तेथे संशयित व्यक्तीच्या घराची झडती घेतली. त्यात काय निष्पन्न झाले, याचा तपशील समजू शकला नाही.

स्थानिक पोलिसांचे मोबाईल ताब्यात
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या कारवाईबाबत अतिशय गोपनियता बाळगली. पथक चौकशीसाठी शहरात आल्याची कोणालाच कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी घेण्यासह त्यांनी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिली होती. एवढेच नव्हे सोबत नेलेल्या तालुका पोलिसांचे मोबाईलही ताब्यात घेतले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणnewsबातम्या