शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी कालवश

By admin | Updated: June 1, 2014 14:16 IST

जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे रविवारी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १ - ढुँढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन.. बिदन तिहारी कोऊ न जाने... या बंदिशीने अभिजात संगीतप्रेमींना मंत्रमूग्ध करणा-या व जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे रविवारी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. 
जयपूर अत्रौली घराण्याच्या बुजुर्ग गायिका म्हणून ओळखल्या जाणा-या धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्म २३ जुलै १९२७ मध्ये कोल्हापूरमधील हिरवडे गावात झाला. गणेश कुलकर्णी या सर्वसामान्य शिक्षकांच्या घरी जन्मलेल्या धोंडूताई यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. कोल्हापूरात उस्ताद नत्थनखाँ यांच्याकडे सुरुवातीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याचे थोर गायक उस्ताद अल्लादियाखाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी प्रथमच रेडिओवर एक कार्यक्रमही सादर केला. १९५०मध्ये अल्लादियाखाँ यांच्या निधनानंतर लक्ष्मीबाई जाधव व ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर या धोंडूताईंना गुरु म्हणून लाभल्या. जयपूर घराणाच्या गायकीची विशूध्द परंपरा धोंडूताईंनी पुढे चालवली. शास्त्रीय संगीतात ठसा उमटवूनही धोंडूताई नेहमीच अत्यंत साधेपणाने राहायच्या. धोंडूताई कुलकर्णींनी गायलेल्या असंख्य बंदिशी आजही रसिकांना मंत्रमूग्ध करतात. घराण्याची परंपरा पुढे नेताना धोंडूताईंनी अनेक गायकांना घडवलही. पण ग्लॅमरपासून त्या सदैव लांब राहिल्या. 
रविवारी दुपारी बोरीवली येथील निवासस्थानी धोंडूताई कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. शास्त्रीय संगीताचा आधारवड हरपला अशी भावना संगीत क्षेत्रात व्यक्त होत आहे.