शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या प्रचारात गडकरी सक्रिय होणार, एक महिना देणार, मात्र नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:10 IST

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक महिना सक्रिय असतील.

 नागपूर - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक महिना सक्रिय असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आम्ही लढू,  गडकरी यांनी प्रचारासाठी एक महिना देण्याचे मान्य केले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही २१ नेते महाराष्ट्रात वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करणार आहोत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे प्रचार समन्वयक असतील.  सगळ्या नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे. भूपेंद्र यादव, अश्वनी वैष्णव प्रभारी आहेत. नितीन गडकरी हे आमच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रेम करतो. त्यांनी निवडणूक प्रचारासाठी एक महिना द्यावा, अशी विनंती त्यांना केली होती, ती त्यांनी मान्य केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी नागपूर सोडून १५ दिवस दिलेले होते, असे बावनकुळे म्हणाले. 

गडकरी देशासाठी आदर्श आहेत- गडकरींना महाराष्ट्र हृदयाने प्रेम करतो. भारतीय जनता पक्षासाठी ते काम करणारे आहेत. देशासाठी आदर्श आहेत.- लोकसभेत त्यांनी पंधरा दिवस महाराष्ट्राला दिले, विधानसभेत एक महिना देतील, महाराष्ट्रासाठी नितीन गडकरी पूर्ण एक महिना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस तेरी खैर नही, याचा अर्थ काय?-‘एकनाथजी से बैर नही, फडणवीस तेरी खैर नही’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून आले आहे. याचा अर्थ काय निघतो. - सगळे मिळून फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४