शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी शायनिंग

By admin | Updated: May 27, 2014 01:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळ शपथ घेत असल्याचे थेट प्रक्षेपण लाखो नागपूरकरांनी वृत्तवाहिन्यांवर पाहिले. शपथ घेण्यासाठी गडकरी यांचे नाव पुकारताच नागपुरात

उपराजधानीत जल्लोष: ढोल-ताशे, आतषबाजी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळ शपथ घेत असल्याचे थेट प्रक्षेपण लाखो नागपूरकरांनी वृत्तवाहिन्यांवर पाहिले. शपथ घेण्यासाठी गडकरी यांचे नाव पुकारताच नागपुरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. जोरात आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्ते नाचले. मिठाई वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रॅलीत जीपवर मोदी गुजराती समाजातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासारखी दिसणारी तसेच मोदींसारखी वेशभूषा केलेली व्यक्ती सहभागी झाली होती. रॅलीतील जीपमध्ये स्वार असलेल्या या मोदींना नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. लोहाणा महाजनचे माजी अध्यक्ष सुभाष जोबनपुत्रा यांनी ही वेशभूषा धारण केली होती. रॅलीत लोक हर हर मोदींचे नारे लावत होते. लोक प्रतिकात्मक मोदींचे अभिनंदन करीत होते व मोदी ते अभिनंदन स्वीकारत होते. महिला कार्यकर्त्या खेळल्या फुगडी महाल, टिळक पुतळा येथील भाजपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी महापौर कल्पना पांडे, माया इवनाते, महिला आघाडीच्या अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फुगडी धरून आनंद व्यक्त केला. मिठाई खाऊ घालत एकमेकांचे तोंड गोड केले. तत्पूर्वी पदाधिकार्‍यांनी कार्यालयात बसून टीव्हीवर शपथविधी पाहिला. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे व भाजयुमोचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी मिठाई वितरित केली. प्रभागातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी) शपथविधी पाहण्यासाठी लावले स्क्रीन नरेंद मोदी व मंत्रिमंडळाचा राष्ट्रपती भवनातील शपथविधी नागरिकांना लाईव्ह बघता यावा यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. व्यापार्‍यांतर्फे मस्कासाथ येथे सहा मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. शपथविधी सुरू होताच सर्व व्यापारी, भाजप कार्यकर्ते, नागरिक या स्क्रीनजवळ जमले. गडकरी शपथ घेत असताना सर्वांनी त्यांना पाठिंबा देणार्‍या घोषणा केल्या. येथे चंदन गोस्वामी, अजय अग्रवाल, गोविंद पटेल, अरविंद पटेल आदी उपस्थित होते. गोळीबार चौकातही स्क्रीन लावण्यात आले. गुजरात भवन, महाल येथेही स्क्रीन लावण्यात आले.