पोलिसांना आता साप्ताहिक सुटीचा पूर्ण पगार

By Admin | Updated: March 31, 2015 04:15 IST2015-03-31T04:15:27+5:302015-03-31T04:15:27+5:30

पोलिसांनी साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केले तर त्यांना एक दिवसाचे वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली

The full weekly salary for the weekly police | पोलिसांना आता साप्ताहिक सुटीचा पूर्ण पगार

पोलिसांना आता साप्ताहिक सुटीचा पूर्ण पगार

मुंबई : पोलिसांनी साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केले तर त्यांना एक दिवसाचे वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. या निर्णयाचा फायदा राज्यातील २ लाख ६० हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना होणार आहे.
सण, व्ही.आय.पी.चा बंदोबस्त, राजकीय स्तरावरील महत्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीवेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कमर्चा-यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या जातात. यापोटी त्यांना अत्यल्प भत्ता आतापर्यंत दिला जात होता.
भाजपाचे आशिष शेलार यांनी
भत्ता वाढीची मागणी केली होती.
पोलीस दलातील पोलीस शिपाई ते
पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या कमर्चा-यांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी
काम केल्यास पूर्वी ५८ ते ६० रुपये
मिळत असत. मात्र आता यात वाढ
होऊन ही रक्कम एक दिवसाच्या पगाराऐवढी झाली असून ही रक्कम ४९० ते
९०२ रुपयांपर्यंत आहे. मात्र यापुढे
एक दिवसाचा पगार दिला जाईल,
असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: The full weekly salary for the weekly police