'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:47 IST2025-10-31T17:45:00+5:302025-10-31T17:47:28+5:30

Sushma Andhare’s Post for Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी प्रार्थना केली आहे. 

‘’Friends are like firewood in a fire…’’, Sushma Andhare’s special post for ailing Sanjay Raut | 'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट

'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर संजय राऊत यांना प्रकृती अस्वस्थ्यामिुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागणार असल्याने ही बाब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुषमा अंधारे यांनी या पोस्टची सुरुवात ’मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, अशा शब्दात केली आहे. त्या पुढे लिहितात की, ‘’लवकर बरे व्हा. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिकरीत्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्तीविरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यांतसुद्धा आपण पुरवत राहणार आहात, असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला.

त्यांनी पुढे लिहिले की, सन्माननीय पक्षप्रमुखांवर चौफेर हल्ले होत असताना छातीचा कोट करून आपण हा शिवसेनेचा गड वाचवण्यासाठी उभे राहिलात. खऱ्या अर्थाने मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे नेमकं काय हे आपल्याकडे बघितल्यावर महाराष्ट्राला कळतं.

आपण ठणठणीत बरे होणार आहात. आपल्यासोबत फक्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचेच नाही तर इथला प्रत्येक दबलेला पिचलेला आणि भाजपच्या दंडेलशाहीने मेटाकुटीस आलेला प्रत्येक माणूस आपल्यासारख्या लढाऊ शिलेदारासाठी ठामपणे उभा आहे या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. आपल्याला उदंड आयुष्य लाभो..! आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत! अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

Web Title : बीमार संजय राउत के लिए सुषमा अंधारे का पोस्ट: 'मित्र...'

Web Summary : संजय राउत की बीमारी पर सुषमा अंधारे ने चिंता जताई। उन्होंने उनकी सेहत के लिए प्रार्थना की और शक्तिशाली ताकतों के खिलाफ उनकी लड़ाई को सराहा, उन्हें सच्चा दोस्त बताया।

Web Title : Sushma Andhare's heartfelt post for ailing Sanjay Raut: 'A friend...'

Web Summary : Sanjay Raut's health setback prompts concern. Sushma Andhare prays for his recovery and acknowledges his unwavering fight against powerful forces, recognizing him as a true friend and fighter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.