शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai ST Bank: एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:13 IST

Mumbai ST Bank Fight: बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे  संचालक घाडगे यांनी विरोध केला.

Mumbai ST Bank Clash: एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी झाली. एका गटाचे संचालक बैठकीच्या चित्रीकरणास झालेल्या विरोधातून बाटलीफेक, शिवीगाळ आणि संचालकांमध्ये झटापट झडल्याचे समजते.    

या बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे  संचालक घाडगे यांनी विरोध केला. बैठकीतील माहिती बाहेर जाता कामा नये, असे घाडगे म्हणाले. त्यावर त्यांच्या शेजारी बसलेल्या एका सदस्याने तावातावाने उठून समोर बसलेल्या सदस्यांवर पाण्याची बाटली फेकून मारली.  यावेळी दोन्ही गट शिवीगाळ करीत भिडले. या घटनेचा एक व्हिडीओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेची नोंद नागपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

बैठक सुरू असताना भ्रष्टाचार, बेकायदा कामे आणि गैरवर्तणुकीच्या मुद्द्यावरून संचालकांमध्ये वाद निर्माण झाला. बाहेरून लोक बोलावून मारहाण केल्याचा आरोप दोन्ही गटांनी परस्परांवर केला आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच बँकेचे अध्यक्ष माधव कुसेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पळालो नसतो तर जीव गेला असता!एसटी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून बँकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे तक्रारी केल्या आहेत. आज आम्ही पळून गेलो नसतो, तर आमचा जीव गेला असता. गुणरत्न सदावर्ते हे बँकेत घोटाळे करत असून, या हल्ल्यामागे त्यांचा हात आहे. 

‘गैरव्यवहार लपवण्यासाठी गदारोळ’ एसटी कर्मचारी काँग्रेसनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, चेअरमन आणि व्हाइस चेअरमन बैठकीला हजर नसल्याने राडा झाला. बँकेत बेकायदा भरती, संगणक खरेदी आणि पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हे सर्व लपविण्यासाठी हा गदारोळ घातला आहे. 

डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार!एसटी कामगार संघटनेचे तसेच कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, सदावर्ते गटाने जाणूनबुजून हा हल्ला केला. बाहेरून आणलेल्या लोकांनी सभागृहात गोंधळ घातला. भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न उपस्थित केला, तेव्हा राडा घडवून आणला गेला. सौरभ पाटील एमडी असताना १२ कोटींच्या डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार झाला. हे उघड होऊ नये म्हणूनच पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brawl at ST Bank Meeting: Bottles Thrown, Abuse, Allegations Fly

Web Summary : Chaos erupted at an ST Cooperative Bank meeting with physical altercations and accusations of corruption. Disputes over filming the meeting escalated, leading to bottle throwing and verbal abuse. Allegations of corruption and illegal activities fueled the conflict, with both sides blaming each other for the violence.
टॅग्स :state transportएसटीGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेViral Videoव्हायरल व्हिडिओ