शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमधील चांदूरबाजारचे चार वाहतूक पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 18:40 IST

गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने घडविलेल्या अपघातमालिकेनंत चांदूरबाजार येथील सर्व चार वाहतूक पोलीस निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ही कारवाई केली.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 20 - गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने घडविलेल्या अपघातमालिकेनंत चांदूरबाजार येथील सर्व चार वाहतूक पोलीस निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ही कारवाई केली.वाहतूक पोलिसांना निलंबित करणाऱ्या लखमी गौतम यांनाही निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी चांदूरबाजार येथील नागरिक कमालिचे संतप्त झाले होते. लखमी गौतम यांच्याविरुद्ध आरोग्य केंद्रात आणि इतर ठिकाणी जोरदार नारेबाजी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकाविरुद्ध इतक्या प्रचंड प्रमाणात रोष उफाळून येण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. लखमी गौतम यांच्याविरुद्ध रोष असल्याने चांदूरबाजार येथील जमावाला संबोधित करण्याचे धाडस ते दाखवू शकले नाहीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्यावतीने ते स्थिती हाताळत आहेत. अचलपूरचे आमदार बच्चू कडू घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत इंगळे हे कडू यांच्या प्रहार पक्षाचे कार्यकर्ता होते. मृतांच्या शवांचे अद्यापही विच्डेदन झालेले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक गौतम यांच्यावर कठोर कारवाई करा त्यानंतरच शवविच्छेदन करू देऊ अशी ताठर भूमिका नागरिक आणि नातेवाईकांनी घेतली आहे. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या निषेधार्थ अवघे चांदूरबाजार आज उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आले आहे. शाळादेखील बंद ठेवण्यात आल्यात. गुरुवारी इयत्ता दहावीची परीक्षा असल्यामुळे नगरपालिका विद्यालयात परीक्षेची व्यवस्था करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रण ठेवण्यासाठी वाशिम जिल्ह्यातूनही पोलीस कुमक बोलविण्यात आली. ट्रकचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी नागरिकांनी लावून धरली. जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून जनतेच्या भावना पोहचविल्या.