शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

नियम मोडून लोकलप्रवास केल्याने मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांना अटक

By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 8:12 AM

मुंबई आणि उपनगरामधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

ठळक मुद्देलोकल प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी मनसेकडून देण्यात आली होती सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक मनसे नेते संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांनी काल लोकल प्रवास केला होतासंदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांनाही अटक करण्यात आली

रायगड - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करत मनसेने काल सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास केला होता. या आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांविरुद्ध कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त टीव्ही नाईन मराठीने दिले आहे. मनसेच्या या नेत्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.मुंबई आणि उपनगरामधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मनसे नेते संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांनी काल लोकल प्रवास केला होता. दरम्यान, आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली. संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांनाही अटक करण्यात आली आहे.दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, मला अजून अटक करण्यात आलेली नाही. आम्ही स्वतः पोलिसांकडे जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक झाल्याची कदाचित ही देशातील पहिलीच घटना असेल. या कारवाईमधून सरकारचा आकस दिसून येतो आहे. आम्ही केलेले आंदोलन प्रतिकात्मक आहे. प्रवाशांच्या समस्यांबाबत सरकारने आमच्याशी बोलावे, किमान प्रवासी संघटनांशी बोलावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवासविषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकलेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर सोमवारी  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन केले. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सुरु करा. बसमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, अशी अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी केली होती. बसमधून प्रवास केल्यास कोरोना पसरत नाही. मात्र रेल्वेने प्रवास केल्यास कोरोना पसरतो असा सरकारचा समज आहे. त्यामुळे आज आम्ही सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आम्ही नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करत आहोत, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे