शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 7:25 AM

संदीप तिवारी ऊर्फ डॉक्टर हा आरोपींना आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही एमडी पावडर बनविण्यासाठी केमिकल मिश्रणाचा फॉर्म्युला तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ठाणे : उत्तर प्रदेशातील (यूपी) मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाच्या पावडर निर्मितीचा आणखी एक कारखाना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. या कारवाइत ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एमडी पावडरसह २० कोटी १८ लाख ४९ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या आरोपींना ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांच्यासह चार पथकांनी पुन्हा यूपीतील वाराणसीमध्ये वेशांतर करून दोन आठवडे तळ ठोकला. यूपीच्या विशेष कृती दलाच्या मदतीने विजय पाल, बिंदू यांचा शोध घेतला. त्यांनी आजमगढमध्ये अमलीपदार्थाचा कारखाना सुरू केल्याचे समजले. त्यानुसार छापा टाकून संदीप तिवारी, ललित ऊर्फ सोनू राकेश चंद्र पाठक, अनिल जयस्वाल, नीलेश पांडे, विजय रामप्रसाद पाल, बिंदू ऊर्फ जिलाजीत जोखई पटेल, यांना अटक केली. या कारवाईत २५ ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर, २० किलो एमडी हा अमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपींची कार आणि इतर सामग्री, असा २० कोटी १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

डॉक्टर द्यायचा ड्रग्जचा फॉर्म्युला

संदीप तिवारी ऊर्फ डॉक्टर हा आरोपींना आणि मुंबईतील ड्रग्ज  रॅकेटमध्येही एमडी पावडर बनविण्यासाठी केमिकल मिश्रणाचा फॉर्म्युला तयार करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

● यापूर्वी याच प्रकरणात ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात २४ जानेवारी २०२४ रोजी एनडीपीएसअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये आफताब मलाडा याच्यासह सात जणांना अटक केली होती. सुरुवातीला केवळ १५ ग्रॅम एमडी पावडरसह दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती.

चौकशीत उत्तर प्रदेशातून २७ कोटी ७८ लाख ५५ हजारांचा • मुद्देमालासह एमडी पावडर निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. यामध्ये क्रिस्टल पावडर बनविण्याच्या मोठ्या प्रमाणात समावेश होता.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक