शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 6:32 AM

'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे.

संजय शर्मा

नवी दिल्ली: मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर, 'सब का साथ, सब का विकास' याऐवजी थेट मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील. एवढेच नव्हे, तर निवडणुकीच्या सातही टप्प्यांसाठी वेगवेगळी रणनीती आखण्यात आली असून, निवडणुकांचे विविध मुद्दे मांडले जाणार आहेत.

'अब की बार, ३७० पार, एनडीए के साथ ४०० पार' अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतेत आहे. पहिल्या टप्प्यात सहा टक्क्यांहून कमी, तर दुसऱ्या टप्प्यातही चार टक्क्यांहून कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ मध्ये जिंकलेल्या ३०३ जागांसाठी किमान ६९ टक्के मतदान होणे आवश्यक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतांपैकी ३८ टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा भाजपने यापूर्वी जिंकल्या जागा आहेत. ही बाब लक्षात घेता भाजपने आपल्या रणनीतीत बदल करण्याची योजना आखली आहे.

विरोधकांना लक्ष्य करण्यावर भर

■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढील सभांमध्ये सब का साथ, सब का विकास' यावर नाही, तर ते थेट मुस्लिमांवर टीका करणार आहेत.■ भाजपचे इतर स्टार प्रचारक, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांवर थेट हल्ला करतील.■ काँग्रेस लोकांकडून त्यांची संपत्ती, सोने, चांदी, मंगळसूत्र हिसकावून घेऊन रोहिंग्यांना आणि घुसखोरांना देईल, असे पंतप्रधानही आपल्या भाषणात सतत सांगत आहेत.

मतदान वाढविण्यासाठी संघटना सक्रिय

 मतदान वाढवण्यासाठी भाजपने आपली संघटना सक्रिय केली आहे. बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठया वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे.

● फ्लोटिंग व्होटरला (मतदानाबाबत निर्णय न घेतलेला मतदार) आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीतीत बदल केला आहे. संघटनेच्या जोरावर तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढतो की नाही, हे पाहायचे आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक