शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण उपायुक्तांना चार दिवसांची कोठडी

By admin | Updated: May 25, 2014 05:37 IST

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोकण आयुक्तालयातील प्रशासन उपायुक्त भाऊसाहेब पाटील यांना आज ठाणे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले

नवी मुंबई : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोकण आयुक्तालयातील प्रशासन उपायुक्त भाऊसाहेब पाटील यांना आज ठाणे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब पाटील (वय ५७) १९८३पासून शासकीय सेवेत आहेत. ठाणेमध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने डिसेंबर २०११पासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. चौकशीमध्ये तब्बल ११ कोटी ३४ लाख ६८ हजार ६० रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्यामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज ठाणेमधील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत विभागाची या वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, पाटील यांनी नोकरीमध्ये लागल्यापासून उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवली आहे. पत्नी अर्चना व स्वत: पाटील यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये ३ सदनिका, १ गोडाऊन, ५ ठिकाणी बागायती जमीन, रोख व इतर संपत्तीचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. या जमिनी सोलापूर जिल्ह्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)