शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार कंत्राटदार काळ्या यादीत

By admin | Updated: July 29, 2015 02:12 IST

राज्यभरातील कारागृहामधील कैद्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा निकृष्ट पुरवठा केल्यावरून चार मोठ्या कंत्राटदारांना काळ््या यादीत टाकण्यात आले आहे.

- जमीर काझी, मुंबईराज्यभरातील कारागृहामधील कैद्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा निकृष्ट पुरवठा केल्यावरून चार मोठ्या कंत्राटदारांना काळ््या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना ३ ते ५ वर्षे निविदा प्रक्रियेतून वगळण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यातील दोन, कोल्हापूर व मदुराईतील एका कंपनीचा त्यात समावेश आहे.तुरुंग विभागाकडून बऱ्याच वर्षांनंतर पुरवठादार कंपन्यांची काळी यादी जाहीर करण्यात आली आहे. कारागृहाच्या महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी तुरुंगातील मालाच्या दर्जाबाबत कठोर भूमिका घेतल्याने संबंधित पुरवठादारांवर कारवाई करणे शक्य झाल्याचे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुण्यातील मे. चाईस व मे. वर्धमान पेपर सेंटर, कोल्हापुरातील आर. टी. मुग व मदुराईतील मे. तिरुपती टेक्सटाईल्स अशी काळ््या यादीत टाकलेल्या पुरवठादारांची नावे आहेत. कोल्हापुरातील मुग व पुण्यातील वर्धमान पेपर सेंटरला प्रत्येकी ५ तर उर्वरित दोघांना प्रत्येकी ३ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.राज्यात मुंबई, ठाणे, तळोजा, येरवडा, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती व औरंगाबाद या ९ ठिकाणी मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्याशिवाय ३० जिल्हा तर ११ खुली कारागृहे, एक खुली वसाहत व १७२ उप-कारागृहांचा समावेश आहे. त्यातील कैद्यांची एकूण क्षमता २३ हजार ६१७ इतकी आहे. कैद्यांना दिले जाणारे जेवण व अन्य आवश्यक वस्तू, कारागृहातील साहित्यांची खरेदी दरवर्षी निविदा मागवून केली जाते. त्यामध्ये मालाच्या दर्जाबरोबर किमान निविदा असणाऱ्या पुरवठादारांची एक वर्षासाठी निवड केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या मालाचा दर्जा व गुणवत्तेमध्ये फरक असल्याचे, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून कारागृह प्रशासनाच्या नियम व अटीचे उल्लंघन करुन निकृष्ट दर्जाचा माल पुरविला जात असल्याचे महानिरीक्षक बोरवणकर यांनी केलेल्या तपासणीतून आढळून आले. त्यानुसार सर्व पुरवठादार कंपन्यांची छाननी करण्यात आली.कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या मालाच्या दर्जामध्ये तफावत आढळली. तसेच संबंधित पुरवठादारांनी नियम व अटींचे उल्लंघन केल्याने त्यांचा काळ््या यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई झाली असून प्रतिबंधित मुदतीत त्यांना कसल्याही प्रकारच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.- मीरा बोरवणकर, अप्पर महासंचालक व कारागृह महानिरीक्षक