तलावातील चारही मृतदेह सापडले

By Admin | Updated: June 14, 2014 04:50 IST2014-06-14T04:50:56+5:302014-06-14T04:50:56+5:30

तालुक्यातीलजोडतळा शिवारातील पाझर तलावामध्ये बुडालेल्या तीन बहिणींसह पित्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना शुक्रवारी पहाटे यश आले

Four bodies of the tank were found | तलावातील चारही मृतदेह सापडले

तलावातील चारही मृतदेह सापडले

हिंगोली : तालुक्यातीलजोडतळा शिवारातील पाझर तलावामध्ये बुडालेल्या तीन बहिणींसह पित्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना शुक्रवारी पहाटे यश आले. दरम्यान, आपल्या तिन्ही मुलींचा घातपात झाल्याचा जवाब आई मंगलाबाई पवार हिने दिल्यामुळे संशयावरून सहा आरोपींविरूद्ध खुनासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.
हिंगोली तालुक्यातील जोडतळा व हिरडी या गावांदरम्यान असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मंदाकिनी (१८), पूजा (१६), पूनम पवार (१४) बुडू लागल्याने त्यांची लहान बहीण कोमल पवार हिने वडील सुंदरसिंग पवार यांना तेथे बोलावून आणले. त्यांनी पाण्यात उडी मारून मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाण्यात बेपत्ता झाले होते. दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी ५.३० वाजता मंदाकिनी पवार हिचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, या प्रकरणी कोमल पवार हिने दिलेल्या माहितीवरून बासंबा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर वाहनांचे हेडलाईट व बॅटऱ्यांच्या उजेडात शोधमोहीम सुरूच ठेवली. बोटींगच्या सहाय्याने तलावाचे पाणी ढवळण्यात आल्यानंतर अन्य तीन मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)

Web Title: Four bodies of the tank were found