शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपसभापतीची नक्षलवाद्यांकडून हत्या

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती व पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता निघृण हत्या केली.

एटापल्ली : क्वॉर्टरमध्येच गोळ्या झाडल्या एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती व  पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून गुरूवारी  सायंकाळी ७.३0 वाजता निघृण हत्या केली. या घटनेमुळे एटापल्ली गावात कमालीची दहशत  पसरली आहे. एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घिसू दुहटा मट्टामी (३८)  हे एटापल्ली येथील पंचायत समिती सभापतीच्या  क्वॉर्टरमध्ये सायंकाळी पत्नीसोबत बाहेर बसले  असताना नक्षलवादी तेथे आल व त्यांनी घिसू मट्टामी यांच्यावर ५ ते ६ गोळ्या अगदी जवळून  झाडल्या. ते जागीच ठार झाले. सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घिसू मट्टामी  हे एटापल्ली तालुक्याच्या हालेवारा गावचे मुळ रहिवासी आहेत. त्यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून  धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हालेवारा गाव सोडून दिले होते. त्यांची पत्नी २0१२ च्या  पंचायत समिती निवडणुकीत हालेवारा भागातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या  व पंचायत समितीच्या सभापती झाल्या. यापूर्वी घिसू हे पंचायत समितीचे उपसभापती होते. घिसू  मट्टामी यांच्या पश्‍चात पत्नी ललिता व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. नक्षलवाद्याच्या भितीमुळे  याच गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते o्रीनिवास गोडसेलवार यांनीही हालेवारा गाव सोडून  गडचिरोलीत आपले कुटुंब थाटले आहे.  (तालुका प्रतिनिधी)